You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला हॉस्पिटलमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले – सतीश सावंत

आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला हॉस्पिटलमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले – सतीश सावंत

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे ७५ कोविड योद्ध्यांचा सत्कार

आ. वैभव नाईक व कुडाळ शिवसेनेच्या वतीने उपक्रम

गेली २ वर्षे कोरोनाच्या कालावधीत आ. वैभव नाईक यांनी आदर्श असे काम केले. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व मेडिकल स्टाफ यांनी दिलेल्या चांगल्या सेवेमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले. या कामगिरीबद्दल शिवसेनेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला हा सत्कार समाजाने केलेला सत्कार आहे.आ. वैभव नाईक यांनी महिला रुग्णालयात डॉक्टर,मेडिकल स्टाफ, ऑक्सिजन सुविधा, रेमडेसिवीर इंजेक्शन, व औषधांचा पुरवठा,तसेच इतर उपकरणे व सोयी सुविधा पुरविल्या. कोरोना काळात कोविड लॅब, ऑक्सिजन प्लांट, डॉकटर, अँब्युलन्स, अशा अनेक सोयी सुविधा उपल्बध करून देण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. तसेच शासनाच्या विविध योजना आपल्या मतदारसंघात राबविण्यासाठी ते अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधीं सारखी स्टंटबाजी न करता प्रामाणिकपणे नागरिकांच्या सेवेसाठी आ.वैभव नाईक काम करत आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ महिला रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये कार्यरत असलेले सर्व डॉक्टर्स नर्स व इतर कर्मचारी यांचा कोविड योद्धा म्हणून आ. वैभव नाईक व कुडाळ शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ७५ जणांना कोरोना योद्धा सन्मान पत्र व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संदेश पारकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोविड काळात राज्यामध्ये चांगल्या प्रकारे काम केले आहे. जगात कोविड १९ सारखी भयानक महामारी चालू असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर ते देशात १ नंबर चे मुख्यमंत्री बनले आहेत. आ. वैभव नाईक देखील रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. तसेच डॉकटर व आरोग्य कमर्चाऱ्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे आपण कोरोना संकटावर हळूहळू मात करत आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने डॉकटर व आरोग्य कमर्चाऱ्यांचा सत्कार करण्यात आल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कोकणवर विशेष प्रेम आहे. त्यांनी कोकणासाठी भरगोस निधी दिला आहे. कोरोना काळ असो किंवा चक्रीवादळ असो.विकासकामे त्याचबरोबर सिंधुदुर्ग मध्ये शासकीय महाविद्यालयासाठी त्यांनी निधी दिला आहे.कुडाळ कोविड सेंटरमुळे कुडाळ बरोबरच जिल्ह्यातील रुग्णांना याचा लाभ झाला. त्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन भविष्यात आरोग्य यंत्रणेत त्यांना संधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगत आ.वैभव नाईक यांनी उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट, विकास कुडाळकर, संजय भोगटे, डॉ. प्रमोद वालावलकर, सचिन काळप, योगेश धुरी, रुपेश पावसकर, जीवन बांदेकर, संदीप म्हाडेश्वर, यश राणे, दीपक सावंत, आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक, डॉकटर, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा