You are currently viewing चौकुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी

चौकुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी

चौकुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी

सावंतवाडी:

चौकुळ येथील धम्मस्मृती बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंचशील ध्वजारोहणाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात
आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतरच्या अभिवादन सभेत उपस्थित वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
वक्त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली आणि त्यांच्या विचारांचा आजच्या काळात कसा उपयोग होऊ शकतो यावर भर दिला. त्यांनी उपस्थितांना बाबासाहेबांच्या विचारांचे
पालन करण्याचे आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले. यावेळी विचार मँचावर मंडळाचे अध्यक्ष अभिजित जाधव, संजय पेंडूरकर, मिलिंद कांबळे, विजय नेमळेकर, केशव जाधव, कांता जाधव, सगुण जाधव, चंद्रकांत जाधव, गुरुनाथ कासले, बुधाजी कांबळे, मधुकर गावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थिती होती.

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये अनंत व्हावू जाधव, बाळकृष्ण व्हानू जाधव, राजाराम व्हानू जाधव, बाळकृष्ण बाबू जाधव, सुरेश बाबू जाधव, वासुदेव जाधव, रुपाजी जाधव आदीचे सत्कार करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत अनुक्रमे पूर्वा सचिन जाधव, आर्वी सचिन जाधव, पौरवी समीर जाधव यांनी क्रमांक पटकाविला. चित्रकला स्पर्धेत अनुक्रमे विधी अभिजित जाधव, पूर्वा सचिन जाधव, अर्णव बाबुराव जाधव क्रमांक पटकाविला. रंगभरण स्पर्धेत प्रथम तृषा कदम आणि द्वितीय
प्रत्युष समीर जाधव हे विजेते ठरले. संगीत खुर्ची (लहान गट) प्रत्युष समीर जाधव आणि दयानंद जाधव हे विजयी झाले. तर मोठा गटात अंशिका पद्माकर कासले आणि निशा गौतम जाधव
हे विजेते ठरले.

या निमित्ताने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जयंती उत्सव यशस्वीतेसाठी सचिन पांडुरंग जाधव, पुंडलिक जाधव, राजेंद्र जाधव, सचिन सुभाष जाधव, अमोल जाधव, समीर जाधव, बाबुराव जाधव, विद्याधर जाधव, महेश जाधव, दयानंद जाधव, योगिता जाधव, समृद्धी जाधव,
सौम्या जाधव, अव्विता जाधव, सान्वी जाधव आदींनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव, विधी संचलन शिल्पा कासले तर आभार संजोग जाधव यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा