You are currently viewing सिंधुदुर्गात हजारोंच्या संख्येने झालेली सदस्य नोंदणी हाच जनतेचा शिवसेनेवरील विश्वास – आ. वैभव नाईक

सिंधुदुर्गात हजारोंच्या संख्येने झालेली सदस्य नोंदणी हाच जनतेचा शिवसेनेवरील विश्वास – आ. वैभव नाईक

*कडावल, नेरूर जि. प. मतदार संघाची बैठक संपन्न*

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सदस्य नोंदणीच्या त्यांनी केलेल्या आवाहनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. गावा गावात प्रत्येक शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनती मुळे हजारोंच्या संख्येने शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली. हजारोंच्या संख्येने झालेली सदस्य नोंदणी हाच जनतेचा शिवसेनेवरील व उद्धवजी ठाकरे यांच्यावरील विश्वास आहे. कुडाळ तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. असंख्य शिवसैनिकांनी मेहनत घेऊन हा बालेकिल्ला राखला आहे. त्यामुळे कितीही दडपण,आमिषे आली तरी आपली मेहनत वाया जाऊ देऊ नका. शिवसेनेची ताकद अजून वाढवायची असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिकांना केले.

शिवसेना जिल्हाप्रमख तथा आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत कडावल जि. प. मतदार संघाची बैठक डिगस येथे तर नेरूर जि. प. मतदार संघाची बैठक माड्याचीवाडी येथे शुक्रवारी संपन्न झाली. यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, माजी उपसभापती जयभारत पालव, रुपेश पावसकर, माजी जी. प.सदस्या वर्षा कुडाळकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर,महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, कडावल विभागप्रमुख नरेंद्र राणे,नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे, बाळा पावसकर, मंजुनाथ फडके, दिलीप सावंत, सुनील सावंत, विद्याधर मुंज, अमित कल्याणकर, अनिवृद्ध करंदीकर, मुकुंद सरनोबत, मंदार खोटावळे, संकेत सावंत, तुकाराम निरूखेकर, आनंद मार्गज,अमोल सावंत, नेरूर विभागातील एम. बी. गावडे, रोहित चव्हाण, शामसुंदर परब, प्रवीण नेरुरकर,दीपेश कदम, सचिन गावडे, सचिन परब, बाळा गावडे, संदीप वारंग, सुभाष परब आदींसह शिवसैनिक मोठया सख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा