You are currently viewing मोपा विमानतळाचे उद्घाटन १३ डिसेंबरला करण्याच्या हालचाली

मोपा विमानतळाचे उद्घाटन १३ डिसेंबरला करण्याच्या हालचाली

बांदा

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी विमानतळ लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून वेळ मागितला आहे. विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा नाव देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांकडून होकार येताच उद्घाटनाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

उत्तर गोव्यात मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले आहे. विमानतळाची बहुतेक कामे ठेकेदार कंपनीकडून पूर्णं करण्यात आली आहेत. २६ ऑक्टोबर रोजी सुरक्षा परवाना मिळाल्याने उदघाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गोव्याच्या पर्यटन हंगामाच्या दृष्टीने गोवा सरकार विमानतळाचे उद्घाटन लवकर करण्याच्या भूमिकेत आहे.

उद्घाटन झाल्यानंतर मोपा विमानतळावर देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असल्याची पुष्टी केल्यावरच आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा होणार सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. आयसीओ (इंटरनॅशनल सिव्हील एव्हीएशन) ची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार आहे.

मोपा विमानतळाची लांबी साडेतीन किलोमीटरची आहे. त्यामुळे मोठे विमान उतरविणे सहज शक्य आहे. महिनाभरापूर्वीच उड्डाण चाचणीही यशस्वीपणे पूर्णं झाली आहे. १९ डिसेंबर गोवा मुक्ती दिनी विमानतळाचे उद्घाटन करण्याचे प्रयोजन होते. मात्र, पंतप्रधानांचा वेळ आधीच मिळाल्यास १३ ऑक्टोबर रोजीच उद्घाटन करण्याचे निश्चित झाल्याची चर्चा सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा