You are currently viewing कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या १० वीचा १००% निकाल

कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या १० वीचा १००% निकाल

कुडाळ :

सन २०२१-२२ या शै.वर्षात घेण्यात आलेल्या सी बी एस ई बोर्डाच्या १०च्या परीक्षेचा निकाल लागला असून बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ चा १००,% निकाल लागला आहे.

इ.१०,वी च्या सदरच्या परीक्षेला बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल चे २१विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्व 21 विद्यार्थी उत्तम गुणाानुक्रमे उत्तीर्ण झाले. यात प्रथम क्रमांक कु.प्रणिता राहूल देशमुख (94.4 टक्के), द्वितीय क्रमांक यशस राहूल केंकरे (90.8 टक्के), तृतीय क्रमांक कु. ध्रुवी आप्पाजी तेरसे (90.4 टक्के) असे यश संपादन केले आहे.

संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, मुख्याध्यापक शुभांगी लोकरे- खोत, यासह शिक्षक मधुरा इन्सुलकर, विभा वझे, नचिकेत देसाई, ऋचा कशाळीकर , प्राजक्ता जाधव, यशश्री खानोलकर, मिशेल फर्नांडिस, चैताली बांदेकर, प्रिया केटगळे अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा