You are currently viewing जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त सखी वन स्टॉप सेंटरतर्फे विविध कार्यक्रम

जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त सखी वन स्टॉप सेंटरतर्फे विविध कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी 

जागतिक महिला दिन सप्ताहा निमित्त सखी वन स्टॉप सेंटरतर्फे मालवण तालुक्यातील गोळवण, कुडाळ तालुक्यातील भडगाव बुद्रुक, ओरोस, आवळेगाव, कणकवली तालुक्यातील तळेरे आणि वेंगुर्ला याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

       सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक ॲड. पूजा काजरेकर व समुदेशक ॲड.रुपाली प्रभू यांनी गोळवण ग्रामपंचायत ता.मालवण येथील कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या उपस्थितीत मान्यवर व उपस्थित महिलांना वन स्टॉप सेंटर योजनेची माहिती  दिली. गरजू पीडित महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच समुपदेशक यांनी जिल्हा महिला बालविकास  विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व योजनेची माहिती व महिलांशी निगडित कायद्याबाबत थोडक्यात सांगितले.

       सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्गच्या केस वर्कर श्रीमती चैत्राली राऊळ‌ व  ॲड. मिनाक्षी नाईक  यांनी सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक ता.कुडाळ येथे इयत्ता पाचवी ते दहावीतील  सर्व मुलांना  लैंगिक दुर्वतन व स्त्री पुरुष समानता या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मुलांच्या अनेक शंकांचे निरसन करत दैनंदिन जीवनातील अडचणींवर चर्चा केली.

       तळेरे, ता.कणकवली जि.सिंधुदूर्ग  येथे आरोग्यविषयक व कायदेविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी केंद्र प्रशासक ॲड. पूजा काजरेकर यांनी सखी वन स्टॉप सेंटर योजनेची माहिती  दिली. तर  केस वर्कर ॲड. मिनाक्षी नाईक यांनी स्त्री पुरुष समानता व भ्रूणहत्या, चैत्राली राऊळ यांनी किशोरवयीन मुली वयात येताना पालकांची भूमिका, पॅरामेडिकल स्टाफ नर्स यांनी Breast, cervical, mouth cancer या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. सल्लागार ॲड.रुपाली प्रभू यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. तळेरे पंचक्रोशीतील ज्या महिलांनी क्रीडा,  सामाजिक कार्य व शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले अशा महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

       न्यू इंग्लिश स्कूल ओरोस ता.कुडाळ येथे इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थिनींना किशोर वयीन मुलांच्या समस्या व आरोग्य तसेच  लैंगिक दुर्वतन या विषयावर मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले. तसेच आवळेगाव हायस्कूल तालुका कुडाळ शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना ॲड.सुवर्णा हरमलकर यांनी महिला सबलीकरण व सक्षमता व ॲड. मीनाक्षी नाईक यांनी स्त्री- पुरुष समानता  या विषयावर  मार्गदर्शन केले व प्रश्नोत्तरे घेऊन मुलांसोबत चर्चा केली.

       वेंगुर्ला तालुक्यातील महिला काथ्या कामगार औद्योगीक सहकारी संस्थेस भेट देऊन तेथील नारळ प्रशिक्षण, काथ्या पासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण याची माहिती घेतली. तसेच सल्लागार ॲड.रुपाली प्रभू यांनी कायदेविषयक मार्गदर्शन व केंद्र प्रशासक ॲड.पूजा काजरेकर यांनी सखी वन स्टॉप सेंटर योजनेची माहिती  दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − twelve =