You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, पंढरपूर शाखेचे स्नेहसंमेलन थाटात संपन्न

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, पंढरपूर शाखेचे स्नेहसंमेलन थाटात संपन्न

सोलापूर :

 

साकव्य पंढरपूर शाखा स्नेहसंमेलन, समूह प्रमुख तसेच साकव्य केंद्रीय अध्यक्ष श्री.पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या पार पडले. साकव्य परिवार सदस्यांसाठी पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री सर्वांच्या संगमाची पवित्र पर्वणीच होती. ती सर्वांच्या देहाबोलीतून ओसंडून वाहताना दिसत होती.

साकव्य परिवारातील पंढरपूर परिसरातील सर्व सदस्य शुक्रवार दिनांक 17 जून 2022 रोजी आगरी धर्मशाळा, पंढरपूर येथे उपस्थित राहीले व स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात व थाटात पार पडले.

पंढरपूर येथे पार पडलेल्या स्नेहसम्मेलनासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये साकव्य प्रमुख श्री.पांडुरंग कुलकर्णी, श्री.चंद्रशेखर शुक्ल, श्रीम.वीणा व्होरा, कांचन कुलकर्णी, श्री.संभाजी अडगळे, श्री.श्रीपाद कुलकर्णी, आदी सदस्य उपस्थित होते.

साकव्य’ परिवार एक आगळा वेगळा सर्वसमावेशक परिवार आहे आणि आपण त्या परिवाराचा अविभाज्य घटक आहोत याचा आपणाला खूप मोठा अभिमान आहे. हे कृतीतून विचारातून चर्चेतून त्या ठिकाणी सिद्ध झाले.

साकव्य पंढरपूर शाखेचे पुढील स्नेहसंमेलन पंढरपूर नगरीत चातुर्मासातील एखाद्या रविवारी संपन्न करण्याचे ठरले. त्या स्नेहसंमेलनात साकव्यच्या केंद्रीय संमेलनाची पहिली निमंत्रण पत्रिका विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून साकव्य सदस्यांनी आपल्या परीनं इतरांनाही आनंद दिला. प्रत्यक्ष भेटीमुळे एक वेगळेच हर्षभरित वातावरण तयार झाले होते.

साकव्यचे केंद्रीय सचिव ह.भ.प.चंद्रशेखर शुक्ल गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले व सभेची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =