You are currently viewing सिंधुदुर्गकन्या सौ.सुरेखा भिसे यांना “महाराष्ट्राची हिरकणी २०२२” पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्गकन्या सौ.सुरेखा भिसे यांना “महाराष्ट्राची हिरकणी २०२२” पुरस्कार प्रदान

हिरकणी फाउंडेशन सातारा आयोजित महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार २०२२ या पुरस्काराचे वितरण नुकतेच सातारा येथे पार पडले. शैक्षणिक, सामजिक क्षेत्र, महिला कौंटुबिक हिंसाचार , महिला सबलीकरण, लघु उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग कन्या सौ.सुरेखा हरीभाऊ भिसे यांना महाराष्ट्राची हिरकणी २०२२ हा सन्मान देऊन सातारा येथे हिरकणी महोत्सवामध्ये मोठ्या थाटात गौरविण्यात आले.

महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या, हिरकणी ग्रुप संस्थापिका अध्यक्षा जयश्री पार्टे शेलार यांनी हिरकणी महोत्सव हे बचत गट उत्पादित वस्तूंचे राज्यस्तरीय खरेदी विक्री प्रदर्शन भरवलेले होते. यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सामाजिक काम करणाऱ्या महिलांना महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमाला मुंबईच्या दर्यादिल ग्रुपच्या अर्चना देशमुख , पाचगणी शहराच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर, डॉ.अरुणाताई बर्गे, विदर्भातील सामाजिक कार्यकर्त्या गुंजन तळेगावकर, लेक माहेरचा कट्टा ग्रुपच्या सारिका ढाणे, महाबळेश्वरच्या नगरसेविका विमल ताई ओंबळे, हिरकणी ग्रुप चे सर्व सदस्य व हजारो सातारकरांच्या उपस्थितीत पार पडला.

महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार २०२२ मिळाल्याबद्दल कणकवली अर्बन बँक कणकवली, आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे यांच्यावतीने सन्मानित करण्यात आले व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सौ. सुरेखा हरीभाऊ भिसे यांचे अभिनंदन होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 12 =