You are currently viewing अंगणवाडी क्रमांक 66 मधील मुलांनी रक्षाबंधन सण केला साजरा…

अंगणवाडी क्रमांक 66 मधील मुलांनी रक्षाबंधन सण केला साजरा…

अंगणवाडी क्रमांक 66 मधील मुलांनी रक्षाबंधन सण केला साजरा…

झाडांनाही राखी बांधत निसर्ग रक्षणाचे दिले धडे

सावंतवाडी

शहरातील अंगणवाडी क्र ६६ च्या छोट्या बालकांनी आज भावांना राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा केला त्याचबरोबर झाडाला राखी बांधून निसर्ग संतुलन राखण्याचे बालसंस्कार या बालकांना देण्यात आले.शहरातील माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जी प शाळेतील महिला व बालकल्याण शहरी विभागाच्या अंगणवाडी क्र ६६ मधील तीन वर्षांच्या बालकांनी अभिनव रक्षाबंधन करत वृक्षाला बंधु मानून राखी बांधली.

तसेच वर्गातील छोट्या भावांना रक्षाबंधन केले
यावेळी अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार, मदतनीस सौ अमिषा सासोलकर,पालक सौ. स्वानंदी नेवगी सपना विर्नोडकर, नेहा काष्टे दिया पेडणेकर सौ टोपले सौ भिसे यांच्या सह पालक महिला उपस्थित होत्या तर या रक्षाबंधन कार्यालयात कु विशाखा साटेलकर सुखम करमळकर स्निग्धा प्रभू रोहित मुंज शिवण्या गवळी गुरुराज केसरकर विष्णू कावले त्रिशा भिसे सावी नेवगी शौर्य निरतवडेकर यांच्या सह ३०हून अधिक बालकांनी सहभाग घेतला.झाडे लावा,झाडे जगवा आणि त्यांची भावासारखी काळजी घ्या अशी शिकवण यानिमित्ताने मुलांना देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा