You are currently viewing *किर्लोस आंबवणेवाडी स्मशानभूमीच्या रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या सहभागातून.

*किर्लोस आंबवणेवाडी स्मशानभूमीच्या रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या सहभागातून.

किर्लोस ( ता. मालवण )

येथील किर्लोस ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या किर्लोस-आंबवणेवाडीतील स्मशानभूमी रस्ता गेली १० वर्षांपासून दुरावस्था झाली होती. पावसाळ्याच्या काळात स्मशानभूमीपर्यंत पोहचण्यासाठी अनेक अडचणीतून जावे लागत होते. त्याविषयी ग्रामस्थांकडून सरकारी पातळीवर पाठपुरावा केला परंतु प्रशासनामार्फत चालढकल केली जात होती. अखेर ग्रामस्थ व किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळाने लोकवर्गणी जमवून रस्त्याच्या पहिल्या टप्याचे काम आज दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले. यावेळी किर्लोस-आंबवणेवाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी दुसर्‍या टप्प्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व प्रशासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा