You are currently viewing नडगिवेत कार व दुचाकीत अपघात; दुचाकीचालक गंभीर…

नडगिवेत कार व दुचाकीत अपघात; दुचाकीचालक गंभीर…

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे येथे सिद्धिविनायक धाब्याच्या समोरील अवघड वळणावर मारूती सुजुकी कार (एम एच ०५ डी एस ३१८३) आणि दुचाकी (एम एच ०३० जे १२६६) या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात दुचाकीस्वार व्हॅनिश हजायॉ डिसोजा (वय – २७ कुर्ला गावठाण मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. सकाळी ८.३० वाजता हा अपघात घडला.

विदर्भ कोकण ग्रामीण सहकारी बँकेचे रत्नगिरी खेड येथील अधिकारी सुनील सतीश तळवेलकर,सागर नवनाथ गायकवाड,प्रफुल्ल कुमार डंगे,नरेंद्र पांडुरंग चव्हाण,प्रबोध गोपाळ हिंदळेकर हे सर्व कणकवली येथील बँकेची बुधवारी मिटिंग संपवुन गुरुवारी सकाळी मारुती सुजूकी या चारचाकी गाडीने खेड येथे चालले होते. मुंबई – गोवा महामार्गावर नडगिवे येथे एका अवघड वळणावर गाडी आली असता मुंबई वरून आलेला व गोव्याच्या दिशेने जाणारा मोटारसायकलस्वार व्हॅनिश डिसोजा याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो जोरदार समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीवर आदळला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात मोटरसायकस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच नडगिवे सरपंच अमित मांजरेकर, उपसरपंच अरुण कर्ले,भावेश कर्ले,सामाजिक कार्यकर्ते भाऊ राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी डिसोझा याला पुढील उपचाराकरिता कणकवली येथे १०८ अँबुलन्स ने पाठविण्यात आले. तर खारेपाटण प्रा आ केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे अधिकारी श्री मोहिते यांनी अपघात स्थळी तातडीने भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरची दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 1 =