You are currently viewing हातेरी धरणातून हिर्लोक, वेताळबांबर्डे गावांमधील शेतीसाठी पाणीपुरवठा सुरु

हातेरी धरणातून हिर्लोक, वेताळबांबर्डे गावांमधील शेतीसाठी पाणीपुरवठा सुरु

आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून जलसंपदा विभागामार्फत हिर्लोक गावातील हातेरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणारी १ कि. मी. पाण्याची लाईन आज पासून सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे हिर्लोक, वेताळबांबर्डे या गावांमधील शेतीसाठी पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे १८ हेकटर शेती क्षेत्र ओलीताखाली आले आहे. ग्रामस्थांनी पाण्याचा फोर्स वाढविण्याची मागणी केली त्यावर आ. वैभव नाईक यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्याशी चर्चा करून पाण्याचा फोर्स वाढविण्यास सांगितले असता श्रीमंगले यांनी प्रत्यक्ष ठिकाणावर जात पाहणी करून इंजिनिअर कडून पाण्याचा फोर्स वाढवून देण्यात आला.
हातेरी धरणातून ६.५ किमी लाईन चे काम देखील प्रस्तावित असून यामुळे ६० हेकटर शेती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या कामाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात १ कि. मी.पाण्याची लाईन सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले, जलसंपदा विभागाचे श्री. जोशी, वेताळ बांबर्डे ग्रा. प. सदस्य शैलेश घाटकर, संतोष कदम,दीपक कदम, जयराम कदम, ठेकेदार प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा