You are currently viewing भाजपचा शिवसेनेला कुडाळ तालुक्यात सुरुंग; कुडाळ सभापती नूतन आईर भाजपात

भाजपचा शिवसेनेला कुडाळ तालुक्यात सुरुंग; कुडाळ सभापती नूतन आईर भाजपात

रांगणा तुळसुली सरपंच सुद्धा भाजपात; राणेंचा शिवसेनेला जोरका झटका

आमदार राणे यांनी केले स्वागत

कुडाळ :
कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नूतन आईर, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनीं त्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले. सभापती सौ. आईर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला जोरका झटका बसला आहे. तर आमदार नाईक यांच्या मतदार संघात या प्रवेशामुळे सुरुंग लागला आहे.
गेले काही दिवस कणकवली तालुक्यातील शिवसैनिक भाजपात प्रवेश करत असतांनाच आज कुडाळ सभापती सौ. आईर यांनी राणेंच्या नेरुत्वाखाली भाजपात प्रवेश केल्याने शिवसेना पक्षाला फरमोठा धक्का बसला आहे. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, भाजपा युवा प्रवक्ता दादा साईल, दीपक नारकर, राकेश कांदेकणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, सोनू सावंत, संदीप सावंत, अरविंद परब, प. स. सदस्य संदेश नाईक, राकेश कांदे, सर्वेश वर्दम,सुनील बांदेकर,पप्या तवटे आदीसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =