You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप

सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप

कणकवली

कळसुली गावचे तरुण तडफदार नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते, सिव्हिल इंजिनिअर, शासकीय ठेकेदार सुशांत दळवी यांनी आज आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप केले. आपला वाढदिवस सामाजिक कार्यासाठी उपयोगात यावा यासाठी त्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.

सुशांत दळवी यांचा कळसुली गावातील सामाजिक कार्यात मोठा वाटा असतो. विविध सामाजिक कार्यात हे हिरीरीने सहभागी असतात. गावात विविध शासकीय, सामाजिक योजना राबविण्यात सुशांत दळवी आघाडीवर असतात. आज आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक ऋणानुबंध जपत त्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केले. गोर गरीबांची जाण ठेवत त्यांनी केलेल्या या मदतीचे रुग्णांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नंदकिशोर परब, संतोष सुतार, सिद्धेश सावंत, निकेतन भिसे, शैलेश दळवी, गणेश पाडावे, आनंद पाडावे, आदित्य मोरे, चंदू परब, सुशील सावंत, रुजाय फर्नांडिस, डेव्हिड फर्नांडिस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =