You are currently viewing तारकर्लीत तरुणाची आत्महत्या

तारकर्लीत तरुणाची आत्महत्या

आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही ; मालवण पोलीस घटनास्थळी दाखल

मालवण :

तारकर्ली वरचीवाडी महापुरुष मंदिर नजीक एका बंद घराच्या खोलीत यशवंत उर्फ मनोज बुधाजी लोणे (वय ३१) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

तारकर्ली वरचीवाडी येथे राहणारा यशवंत लोणे हा पूर्वी स्कुबा व्यवसायात होता. आज सकाळच्या सत्रात त्याने महापुरुष मंदिर नजीक असलेल्या आपली मावशी मीनाक्षी कोळंबकर यांच्या बंद घरात जात गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 − one =