You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे

सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे

सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बुवा तथा भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांची निवड करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी या बाबतचे आदेश समाज कल्याण अधिकाऱ्यांना निर्गमित केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे यांची निवड करण्यात आली असून या समितीमध्ये सावंतवाडी कोलगाव येथील राजाराम धुरी, कणकवली येथील प्रा. हरिभाऊ भिसे, कुडाळ नेरूर येथील सौरभ नारायण पाटकर, मालवण सूकळवाड येथील अजिंक्य पाताडे, वेंगुर्ले वेतोरे येथील शैलेश सदानंद जामदार यांचा समावेश आहे.

संतोष कानडे यांचे जिल्हयाभरातून कौतुक होत आहे. संतोष कानडे हे सुप्रसिद्ध भजनीबुवा असून भजन कलेची आवड त्यांनी गेली 30 वर्षहून अधिक काळ जोपासली आहे. भजनाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार ते करत आहेत. या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना कानडे म्हणाले की जिल्ह्याभरात पारंपारिक लोककलाकाराना न्याय मिळवून देण्याचे काम कलाकार मानधन समिती अध्यक्ष म्हणून मी करणार आहे. ज्या कलाकारांचे उदरनिर्वाहाचे साधन ही त्यांची कला आहे अशा गरजू कलाकाराना प्राधान्याने शासकीय मानधन मिळवून देणार आहे. शासनाकडून पारंपारिक लोककलाकाराना दरमहा रुपये 2,250 एवढे मानधन मिळते. यासाठी सविस्तर प्रस्ताव हा जिल्हा कलाकार मानधन समितीकडे सादर करावा लागतो. जिल्हा कलाकार मानधन समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानंतर समाज कल्याण खात्याकडून कलाकाराला दरमहा 2250 रूपये मानधन मिळते. जिल्ह्यात सध्या 500 हुन अधिक प्रस्ताव प्रलंबित असून सर्व गरजू कलाकारांना शासकीय मानधन मिळवून देणार असल्याचे नूतन अध्यक्ष संतोष कानडे म्हणाले.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =