You are currently viewing सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादी वाढवण्यासाठी काम करेन – पुंडलिक दळवी

सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादी वाढवण्यासाठी काम करेन – पुंडलिक दळवी

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान…

सावंतवाडी
पक्षाने टाकलेला विश्वास नक्की सार्थकी लावेन, येणाऱ्या काळात युवकांना व जुन्या पदाधिकाऱ्यांना घेऊन काम करेन. येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी आज येथे व्यक्त केला.
राष्ट्रवादीच्या माध्यमातून श्री.दळवी यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज त्यांना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी येथील शिल्पग्राम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रांतिक सदस्य काका कुडाळकर ज्येष्ठ नेते शिवाजीराव कुबल, अविनाश चमणकर, सत्यजित धारणकर, दीपक कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =