You are currently viewing मराठी भूताखेतांच्या गोष्टी

मराठी भूताखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी श्री वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*मराठी भूताखेतांच्या गोष्टी*

( क्रमांक ५ …..)

 

पारंपारिक भारतीय संस्कृती मध्ये समाजामध्ये अनेक नित्यनैमित्तिक व्रतवैकल्ये करण्याची परंपरा आजही सुरु आहे ..त्यापैकी वैष्णवी ,वारकरी संप्रदायाची ” *पंढरपुरची वारी* करणारा वारकरी हा अत्यंत भावुक ईश्वर नामस्मरणात तल्लीन होणारा , त्या अनामिक भगवंतावर अढळ विश्वास ठेवणारा असा श्रद्धाळू भक्त आहे ..असाच एक वारकरी सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील रहिमतपुर या गावी रहात होता …रहिमतपुर गावा जवळ ब्रह्मपुरी म्हणून नदी आहे ..इकडे कुठल्याही नदीवर स्नान करणे म्हणजे गंगेचेच स्नान करणे असे समजले जाते .. हे वारकरी गहस्थ जगन्नाथ , रोज नित्य नियमाने या ब्रह्मपुरी नदीवरच ब्रह्ममुहूर्तावर ( पहाटे) आपल्या गावापासून पूर्वीचे ६ मैल म्हणजे आजचे ९ ते १० किलोमीटर चालत चालत स्नानास जात असत ..अगदी लहानपणापासुनच त्यांचा हा नेम होता . त्यांच्या घराण्याची ती परंपराच होती असे म्हणुया ..!

यापूर्वी मी पाहिल्या कथेत सांगितल्या प्रमाणे त्याकाळी देखील घडयाळ नव्हते …त्यावेळचे सर्वच लोक चंद्र , तारे , नक्षत्रे ,यांच्या अनुमानावरुन वेळेचा अंदाज घेत असत . त्याप्रमाणे जगन्नाथ वारकरी देखील एक दिवस आपल्या नित्यनेेमाप्रमाणे ब्रह्मपुरीस स्नानास निघाला होता , गंगेवर जाणे स्नान करणे , घाटावर असलेल्या महादेवाच्या मंदिरात अभिषेक करणे हाच नेहमीचा उद्देश !….पण यादिवशी अमावास्या असल्यामुळे चंद्र चांदणे गायब झाल्यामुळे अनावधानांने अपरात्री (अवेळी ) स्नानास निघाला होता … गावाची वेस ओलांडताच माळरानावर त्याला *वेताळाची* आपल्या गणासह ( भूतपिशाच्च्यासह) पालखी चाललेली आहे असे दिसले ..घाबरला होता !…पण आता परत माघारी फिरणेही शक्य नव्हते …त्याने मनात धीर केला , म्हणाला आपण चांगल्या कामासाठी ,स्नानासाठी , पूजेसाठी नित्यनेम म्हणून निघालो आहोत .. जे काय असेल ते माझा पांडुरंग बघून घेईल …असा विचार करून तो त्या वाटेने निघाला …वेताळबाबाच्या पालखी जवळ पोहोचला ..पालखीत तो भूतांचा राजा वेताळ राजा बसला होता . पालखी समोर सर्व भूते ,पिशाच्च्य नाचत होती ..जगन्नाथ मात्र आपल्या मनात पांडुरंग ! पांडुरंग असा धावा करीत त्या पालखीत बसलेल्या वेताळा जवळ गेला ..त्याच्या पालखीच्या गोंड्याला हात लावून त्याने नमस्कार केला …तेंव्हा त्या वेताळाने त्या जगन्नाथला विचारले तूं यावेळी इथे कसा आलास ? तेंव्हा जगन्नाथने सर्व सांगीतले …तेंव्हा त्या भूतांच्या राजाने तूं पुन्हा असा अवेळी येत जावू नकोस असे सांगीतले व त्याला जाण्यास सांगीतले ..जगन्नाथ निघाल्यावर वेताळाने पुन्हा त्याला बोलावले , जगन्नाथ आला त्याने पुन्हा वेताळाला नमस्कार केला , तेंव्हा वेताळाने त्याला प्रसाद म्हणून ओंजळ भरून *कोळसे* दिले .जगन्नाथाला आश्चर्य वाटले …पण काय बोलणार ..गपचुप तो त्या पालखी समोर नाचणाऱ्या चित्रविचित्र भूत पिशाच्च्यांच्या गराड्यातून बाहेर पडला …आणी ब्रह्मपुरी नदीवर स्नानासाठी गेला …वेताळाने दिलेले ओंजळभर कोळसे त्याने आपल्या धोतराच्या सोग्यात बांधुन आणले होते ….

वेताळाने दिलेल्या त्या कोळश्याबद्दल जगन्नाथाच्या मनात अनेक शंका कुशंका , वाईट विचार येत होते .. त्याने गंगेत स्नानासाठी जाताना …” हे गंगा माते ,हे भगवती हे जे काही मिळाले ते तुला अर्पण म्हणून आपल्या धोतरातील सोग्यात असलेले कोळसे गंगेला अर्पण केले व स्नान करून तो बाहेर आला. निश्चिंत झाला ,पण ओलेते वस्त्र सोडून दुसरे धुत वस्त्र नेसताना त्याला जाणवले की ओल्या वस्त्रात काहीतरी अडकलेले आहे .. त्याने पाहिले तेंव्हा त्या कोळश्याचे सोने झाले होते ….आश्चर्य होते ….(वेताळाने जगन्नाथाला कोळश्याच्या रुपात सोने दिले होते….

सदहेतुने तुम्ही तुमचा संकल्प सत्कर्म पार पाडत असाल तर चांगलेच होते .. वाईट होत नाही .. पिशाच्च्य भूत देखील सर्वाना त्रास देत नसते …आपले वर्तन चांगले असावे …… ऐकलेली रहिमतपुर सातारा येथील सत्य घटना ……

*©वि.ग.सातपुते ( विगसा)*

🙏🙏🙏🙏🙏

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 3 =