You are currently viewing २० ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा लक्षवेधी लाँग मार्चला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख

२० ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा लक्षवेधी लाँग मार्चला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख

*२० ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा लक्षवेधी लाँग मार्चला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख*

स्थानिक औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचा एम.आय.डी.सी.च्या आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भुखंड उद्योजकांना वितरित करुन हे क्षेत्र कार्यान्वित करण्याबाबत महामंडळ, राज्य शासन यांनी चालविलेल्या अनाकलनीय दिरंगाईच्या निषेधार्थ रविवार दि. २० ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लक्षवेधी लाँग मार्च आयोजित करण्यात आला आहे.या लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले. या लाँग मार्च मध्ये काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील.

आडाळी येथे 720 एकर क्षेत्रात 2013 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत औद्यागिक क्षेत्र मंजूर झाले. या प्रकल्पाचे स्वागत करुन त्यानंतर वर्षभरातच स्थानिकांनी आपल्या जमिनीचे महामंडळाकडे हस्तांतरण करून दिले. विकासाच्या गप्पा मारणारे येथील लोकप्रतिनिधी आणि शासनात मंत्री म्हणून मिरवणा-या लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भुखंडांचे वाटप उद्योजकांना झालेले नाही. एक दशक संपले तरी औद्योगिक क्षेत्र गती घेण्याची कोणतीच चिन्हे नसल्याने या विषयाकडे शासनाचे आणि सर्व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी या लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे आणि या लाँग मार्चला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा फक्त पाठिंबाच नाही तर या लाँग मार्च मध्ये मी स्वतः आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होतील असे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आडाळी एम.आय.डी.सी पासून आठ किलोमीटरवर आहे राष्ट्रीय महामार्ग तसेच सावंतवाडी, थिवी ही नजिकची रेल्वे स्थानके आहेत. दोडामार्ग तालुका अतिशय दुर्गम असुन औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे. येथील युवकांना रोजगाराच्या कोणत्याही संधी येथे उपलब्ध नाहीत. यामुळेच या तालुक्यातील जनता या औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीकडे व येथे येणाऱ्या उद्योगांकडे डोळे लावुन बसलेली आहे.आडाळी एम.आय.डी.सी. सुरू झाल्यास आज जे तरूण तरूणी नोकरीसाठी मोठ्याप्रमाणात गोव्यात जातात त्यांना येथेच रोजगाराची संधी मिळू शकते. परंतू या जिल्ह्यातील स्वार्थी आणि स्वतः ला सत्ता मिळवण्यापलिकडे काही सुचत नाही, रोज खोटी आश्वासने देऊन जिल्ह्यातील जनतेला फसवत आहेत त्यांना या जिल्ह्यातील तरूणांच्या रोजगाराचे काही सोयरसुतक नाही. म्हणून या जिल्ह्यातील मंत्री म्हणून शासनात असलेल्या लोकप्रतिनिधीना स्वतःच्या फक्त सत्ता उपभोगण्याच्या स्वार्थापलिकडे जनतेचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या लाँग मार्चला जनतेनही उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा असे आवाहन ही सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे. तसेच आघाडी सरकारच्या काळात भूखंड वाटपाच्या प्रक्रियेला सत्ता परिवर्तन होताच कोणी खो घातला हे जनतेच्या समोर येणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =