You are currently viewing माजी सैनिक विद्यार्थी संघटनकडून सैनिकी वसतीगृहाला दोन बॅटऱ्या भेट…

माजी सैनिक विद्यार्थी संघटनकडून सैनिकी वसतीगृहाला दोन बॅटऱ्या भेट…

सिंधुदुर्गनगरी

माजी सैनिक विद्यार्थी संघटनेकडून विद्यार्थ्यांनी वसतीगृहाला इन्व्हर्टर पुरविण्यात आले. वसतीगृहाच्या इन्व्हर्टरसाठी रक्कम रुपये २५ हजार किंमतीच्या दोन नवीन बॅटऱ्या भेट दिल्या आहेत. यावेळी सैनिकांच्या मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी विंग कमांडर रमेश प्रभूमिराशी आणि त्यांचे सहकारी नारायण राणे, लक्ष्मण गावडे, जयराम गावडे, महादेव सावंत, मनोहर मोडक, तुकाराम बंड, सुर्यकांत कदम, तुकाराम ठोकरे, मोहन राऊळ, शंकर राणे, सखाराम सावंत व त्यांचे इतर सहकारी यांचेव्दारे माजी सैनिक विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

सैनिकी वसतीगृहांतील विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जातात. शिस्त आणि शिक्षणामध्ये सैनिकी वसतीगृहातील विद्यार्थी हे नेहमीच अग्रेसर असतात. अशा मुलांसाठी या संघटनेचा नेहमीच पाठींबा व वरदहस्त राहिलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 1 =