You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘ द व्हॉईस ऑफ एस. एस.जी. एस’ या ई-पेपरचा प्रकाशन सोहळा संपन्न:

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘ द व्हॉईस ऑफ एस. एस.जी. एस’ या ई-पेपरचा प्रकाशन सोहळा संपन्न:

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘द व्हॉईस ऑफ एस. एस.जी. एस’ ई- पेपरचा प्रकाशन सोहळा डिजिटल प्रिंट अशा दोन्ही माध्यमात करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ‘श्री. उमेश तोरसकर’ , सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ‘श्री. हरिश्चंद्र पवार’ व प्रुडंत मीडिया नेटवर्क, मुंबई हेड ‘श्री. सागर चव्हाण’ हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख पाहुणे, शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सौ. जागृती प्रभू तेंडोलकर यांनी शब्दसुमनांनी मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री. उमेश तोरसकर यांनी विद्यार्थ्यांना आपले विचार स्वतंत्रपणे मांडता यावे व विद्यार्थ्यांना कोणत्याही भाषेत म्हणजेच, हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांमध्ये आपले विचार व्यक्त करता यावे या दृष्टीकोनातून ई- पेपर प्रकाशन हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे असे स्वविचार व्यक्त केले. तर श्री. हरिश्चंद्र पवार यांनी इयात्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना या वयातच पत्रकार म्हणजे काय व त्यांची कर्तव्य जाणून घेण्याची ही सुवर्णसंधी प्राप्त झाली असून पत्रकार या पदाकरीता आतापासूनच मिळालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी स्वतः च्या भविष्यासाठी फायदा करून घ्यावा असे मत व्यक्त केले. तसेच श्री.सागर चव्हाण यांनी त्यांच्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या विचारांना व त्यांच्या चिकित्सक वृत्तीला वाव दिला. तसेच कोणतीही बातमी ही फक्त मोबाइलद्वारे न करता विद्यार्थ्यांनी ती लेखन स्वरूपातच मांडावी, म्हणजे विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौलशल्यांचाही विकास होईल असे मत व्यक्त केले. व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात चंद्रयान, अवकाशयात्रा, कृष्णविवर, पशुसंवर्धन आणि शेती, खेळ, विज्ञान, चित्रकला, कार्यानुभव, छायाचित्रकला, कविता अशा विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचे कौतुक केले. मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळेतील सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. या वृत्तपत्रामागे विद्यार्थ्यांच्या कलागुणांबरोबर निरीक्षण व कल्पनाशक्तीला वाव द्यावा तसेच वाचन व लेखन संस्कृती विकसित व्हावी हा मूळ उद्देश समोर ठेऊन हे पाक्षिक सुरू केल्याचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी सांगितले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी स्वतः काढलेले छायाचित्र , चित्रकला, हस्तकला, कार्यानुभव या कलांनाही वाव मिळावा याकडे विशेष लक्ष देण्यात आले. तसेच हा ई- पेपर पाक्षिक असून दर पंधरा दिवसांनी प्रकाशित केला जाईल. व विद्यार्थ्यांना या पेपर मध्ये हिंदी, मराठी व इंग्रजी या तिन्ही भाषेत आपले लेख, कविता, आपले विचार स्वतंत्रपणे मांडण्याची संधी दिली जाईल असे मत श्री. रुजुल पाटणकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ग्रीष्मा सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा. शिक्षिका सौ. जरीन शेख यांनी केले. या कार्यक्रमास शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव, सौ. शीला चव्हाण व सर्व शिक्षकांचे सहाय्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनीही सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − three =