You are currently viewing पळसंब ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणाचा मान स्वातंत्र्य सैनिकाला

पळसंब ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणाचा मान स्वातंत्र्य सैनिकाला

मालवण

मेरी मिट्टी मरा देश अभियानांतर्गत पळसंब ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त पहिल्या दिवशी ध्वजारोहण सरपंच महेश वरक यांच्या हस्ते केले गेले. तर दुसरया दिवशीचे ध्वजारोहण आशा स्वयंसेवीका श्रीमती तनुजा रविकांत परब यांच्या हस्ते केले गेले. तर स्वातंत्र्य दिनी
ग्रामपंचायत पळसंब कार्यालय येथे पळसंब गावातील स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र सिदू वरक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी पळसंब शाळेतील मुलांनी गीत गायन केले, यावेळी सरपंच .महेश वरक,उपसरपंच अविराज परब,ग्रामपंचायत सदस्य संतोष परब,सौ.रसिका साटम,सौ.ऋतुजा सावंत,माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर,माजी उपसरपंच सुहास सावंत,प्रमोद सावंत,शाळा मुख्याध्यापक विनोद कदम ,शाळा समिती अध्यक्ष रविकांत सावंत,अंगणवाडी सेविका,गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा