You are currently viewing छत्तीसगढ: नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर 15 जवान  बेपत्ता

छत्तीसगढ: नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर 15 जवान बेपत्ता

५ जवान झाले होते शहीद

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान पाच सैनिकांना हौतात्म्य आलं होतं. दरम्यान, आता छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीतकमी १५ जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं. तर दुसरीकडे शहीद झालेल्या पाच जवानांपैकी २ जवानांचं पार्थिव सापडलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत जखमी झालेल्या २३ जवानांना विजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर ७ जवानांना रायपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =