You are currently viewing फोंडाघाट एसटी स्टँड वरील विहिरीची दुर्दशा

फोंडाघाट एसटी स्टँड वरील विहिरीची दुर्दशा

फोंडाघाट एसटी स्टँड वरील विहिरीची दुर्दशा

पाहणी करणे संदर्भात फोंडाघाट प्रा. आ. केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याला सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केले निवेदन सादर

फोंडाघाट

फोंडाघाट एसटी स्टँड वर असलेल्या विहिरीचे पाणी अत्यंत आरोग्यास अपायकारक असे झालेले आहे. या विहिरीची पहाणी करणे संदर्भात फोंडाघाट प्रा. आ. केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याला सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी निवेदन सादर केले आहे.
फोंडाघाट एसटी स्टँडवर असलेल्या विहिरीची मागील 30 वर्षे साफसफाई झालेली नाही.
या विहिरीचे पाणी चार लाख रुपये खर्च करून पंप बसवून एसटी स्टँड वरील संडास बाथरूम ला वळवण्यात आले आहे. ही विहीर वरून उघडी असल्यामुळे त्यात झाडांचा पालापाचोळा, शेवाळ, बाटल्या, कपडे आदी निकृष्ट गोष्टी आत पडलेल्या असल्यामुळे हे पाणी जिवितास अपायकारक आहे. अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी आज फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र चे मेडिकल ऑफिसर यांना सादर केले आहे. यावर तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा