हुमरस येथील महिलेचे सरपंचांवरील आरोप पुर्णपणे चुकीचे

हुमरस येथील महिलेचे सरपंचांवरील आरोप पुर्णपणे चुकीचे

हुमरस येथील महिलेचे सरपंचांवरील आरोप पुर्णपणे चुकीचे  – शलाका कवटकर

खरोखरच महिलेवर अन्याय होत असेल, तिथे आम्ही गप्प बसणार नाही..

कुडाळ / प्रतिनिधी :-

कुडाळ तालुक्यातील हुमरस गावातील सरपंच विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एका महिलेने प्रसार माध्यामातून जे सरपंचांवर आरोप केले आहेत, ते पुर्णपणे चुकीचे असून ती महिला मुंबई येथे राहते. तिला गावात कोण ओळखत सुध्दा नाही. आम्हाला सुद्धा त्या महिलेबद्दल ओळख नाही. अशा महिलेने काहीपण बोलू नये. कालच प्रसारमाध्यमांशी बोलली तेव्हा तिची ओळख आम्हाला समजली. विविध जे आरोप करत आहे, त्याने तक्रार देणाऱ्या त्या महिलेची आपण बदनामी करत आहेत, हे तरी आपण ध्यानात घेतले पाहीजे होते.

ह्याचा विचार आरोप करत असलेल्या महिलेनी करावा तसेच खरोखरच महिलेवर अन्याय होत असेल तिथे आम्ही गप्प बसणार नाही. कदापिही महिलांवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. ह्या मताची मी आहे. अशी माहिती हुमरसच्या माजी ग्रा.पं. सदस्या शलाका कवटकर यांनी दिली. निवडणूकीच्या वेळी विद्यमान सरपंच अनुप नाईक यांच्या विरोधात काही मते पडली, तरीही अनुप नाईक निवडून आले. त्यामुळे मोजके विरोधक म्हणजे संपूर्ण गाव नाही. त्यामुळे उगीचच काहीतरी हुमरस सरपंचाविरोधात पुर्ण गाव असल्याचे खोटी माहीती प्रसारमाध्यांना दिली जात आहे. असे शलाका कवटकर यांनी म्हटले आहे.

हुमरस मध्ये जे काही घडवून आणले, ते किती सत्य व असत्य त्याबाबत आता योग्य तो न्याय न्यायालय देईलच. आमचा न्यायदेवतेवर पुर्ण विश्वास आहे. तो न्याय मिळेपर्यत आम्ही सर्वजण हुमरस गावचे सरपंच अनुप नाईक यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याची प्रतिक्रिया सौ. कवटकर यांनी बोलताना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा