You are currently viewing जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 जून रोजी

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 जून रोजी

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 जून रोजी

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.16 जून 2025 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैशाली काकडे यांनी केले आहे.

राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला  समान संधी समान हक्क असा मुलभूत अधिकार दिलेला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी / तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी प्रश्न मांडून त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व  त्यांना न्याय मिळाव या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा एक उत्तम मार्ग आहे. महिलांनी त्यांच्या अडणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्ध करुन घ्यावेत. अर्ज विहीत नमुन्यात असावा. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुण्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्र न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदने वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा