You are currently viewing कळी उमलताना

कळी उमलताना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा,आजगाव समूहाचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कळी उमलताना*

लावियले रोप ज्याने
आस त्याला खास आहे |
वाढविले रोप ज्याने
चिंता त्याला खास आहे ||१||
रोपणे सोपेच आहे
जपणे कठीण आहे |
ज्याने संवर्धित केले
त्याचे तेथे लक्ष आहे ||२||
यौवनाचे सुख आले
रोप परिपक्व झाले |
कळ्यांचा बहर येता
रोप लक्षवेधी झाले ||३||
मोही कुणी होत आहे
आंधळा अभागी पहा |
फुलण्याआधीच कळी
खुडणे बरे का पहा ||४||
कळ्या मुक्त फुलण्यात
निसर्ग सौंदर्य आहे |
कळीचे आयुष्य पूर्ण
फूल फुलण्यात आहे ||५||
होऊ द्या ती परिपक्व
सुमनकांती सुगंधी |
लेकरे ती परिपक्व
मातृमन ही सुगंधी ||६||
कळ्याफुलाफळाझळा
लागू न दे तू अवेळी |
पहा निसर्ग सोहळा
परिपूर्णतेच्यावेळी ||७||

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला, जि. :-
सिंधुदुर्ग, राज्य. :- महाराष्ट्र.

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा