You are currently viewing ध्वज देशाचा

ध्वज देशाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ध्वज देशाचा* ( बाल गझल )

 

वृत्त : अनलज्वाला

 

अभिमानाने नभी फडकतो ध्वज देशाचा

गगनामध्ये लुकलुक करतो ध्वज देशाचा

 

बलिदानाची साक्ष देतसे रंग केशरी

माथ्यावरती रंग खुलवतो ध्वज देशाचा

 

‘शांती वचने’ स्थान मिळाले सफेद रूपी

गीत प्रितीचे गात राहतो ध्वज देशाचा

 

हिरव्या रंगीं नटून येतो निसर्ग सारा

खोल तळाशी मग सळसळतो ध्वज देशाचा

 

चक्र शोभते निळे मनोहर मानवतेचे

त्याच्या संगे संथ ‘डोलतो ध्वज देशाचा

 

स्वातंत्र्याचा दिन भाग्याचा येतो जेव्हा

मिळून सारे हाती धरतो ध्वज देशाचा

 

व्योमामध्ये निनाद उठतो जयकाराचा

अंबरात मग उंच लहरतो ध्वज देशाचा

 

श्रीनिवास गडकरी

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा