You are currently viewing मनसेच्या वतीने आकर्षक गड किल्ले बनविणाऱ्या मुलांंना पारितोषिके देऊन गौरव….

मनसेच्या वतीने आकर्षक गड किल्ले बनविणाऱ्या मुलांंना पारितोषिके देऊन गौरव….

मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी राबविला उपक्रम

सावंतवाडी :

येथील प्रभाग क्रमांक 6 खासकिलवाडा मध्ये दिवाळी सणामध्ये लहान मुलांनी विविध आकर्षक किल्ले बनविले होते. या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मनसेच्यावतीने ह्या किल्ल्यांना प्रथम तीन क्रमांक देऊन पारितोषिक जाहीर केली. त्यामध्ये सोहम सावंत यांच्या किल्ल्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.
दिवाळी सणात विविध आकर्षक गड किल्ले शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मुलांनी बनविले होते हे गड किल्ले येथील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते अशा प्रकारचे गड-किल्ले मुलांनी बनवावे यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी या गड-किल्ल्यांची पाहणी केली त्यानंतर त्यांनी या सर्व गडकिल्ल्यांचे परीक्षण करून त्यांना प्रथम 3 क्रमांक तसेच विशेष उल्लेखनीय व उत्तेजनार्थ जाहीर करावे असे ठरविण्यात आले त्यानुसार सुभेदार यांच्या प्रयत्नातून या प्रभागातील सर्व गड-किल्ल्यांचे परीक्षक म्हणून साईश वाडकर व विशाल सावंत यांनी काम पाहिले त्यामध्ये प्रथम क्रमांक सोहम सावंत याला जाहीर करण्यात आला. द्वितीय स्वामी गावडे,  तृतीय हर्षवर्धन निर्गुण याला जाहीर करण्यात आला.  विशेष उल्लेखनीय म्हणून साईश निर्गुण याच्या किल्ल्याला क्रमांक देण्यात आला,  तर उत्तेजनार्थ कौस्तुभ जामदार आणि साहिल सावंत यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली. क्रमांक पटकाविलेल्या सर्व मुलांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. मनसेचे शहराध्यक्ष आशीष सुभेदार यांच्या वतीने सर्व पारितोषिके जाहीर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तव्य त्यांनी गड किल्ल्यांचे बांधकाम का केले त्यांची दूरदृष्टी याबाबत लहान वयातच मुलांना माहिती मिळावी व छत्रपतींच्या कर्तव्याची जाण व्हावी या उद्देशाने शहराध्यक्ष श्री. सुभेदार यांनी हा उपक्रम राबविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 1 =