You are currently viewing समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी निक्षय मित्र व्हावे – डॉ. दत्ता तपसे

समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी निक्षय मित्र व्हावे – डॉ. दत्ता तपसे

केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत निक्षय मित्र 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत

कणकवली

केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत निक्षय मित्र योजना 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत करण्यासाठी राबविली जात आहेत. यामध्ये क्षयरुग्णांना उपचारादरम्यान पोषण आहार मिळाला नाही तर उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसत नाही. क्षय रुग्णाला 6 महिन्यासाठी दत्तक घेऊन 6 महिने केंद्र सरकारच्या नियमानुसार आहार दिला जातो. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी निक्षय मित्र व्हावे, असे आवाहन नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांनी केले आहे. डॉ. दत्ता तपसे यांनी निक्षय मित्र बनून एक रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेऊन नुकताच त्याला सकस आहार दिला आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी निक्षय मित्र होऊन टीबी रुग्णांना मदत करावी जेणेकरून भारत 2025 पर्यंत टीबी मुक्त होईल, असे आवाहन डॉ. दत्ता तपसे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा