You are currently viewing खरचं आहे का हो आपला हिंन्दुस्ता सारे जहास अच्छा’?

खरचं आहे का हो आपला हिंन्दुस्ता सारे जहास अच्छा’?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवीसंजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

*’खरचं आहे का हो आपला हिंन्दुस्ता सारे जहास अच्छा’?*

*************
मणिपुर ची घटना पहता मला अस वाटत की आता सारे जहासे अच्छा हिन्दुस्ता हमारा राहिला नाही.आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो. भारत मेरा महान.पण आता या महानतेवर शंका यायला लागली. एकीकडे भारत मेरा महान किंवा सारे जहासे अच्छा हिंन्दोस्ता हमारा म्हणायचं आणि त्याच हिन्दुस्तानात महिला सुरक्षित नसल्याची खंत वाटते.४मे रोजी मणिपुर येथे जी घटन घडली त्या घटनेचा आक्रोश कालपर्वा सरकारच्या कानावर पडला यावरून राज्यकर्ते किती सतर्क आणि देश किती सुरक्षीत आहे हे कळते.ज्या महिलेची नग्न धिंड काढली त्या महिलेचा नवरा माजी सैनिक आहे आणि कारगिल युध्दात त्याचा महत्वपूर्ण सभाग होता.त्याच सैनिकाच्या पत्नीवर असा अत्याचार होत असेल तर महिलाच नाही तर देश सुध्दा सुरक्षित नाही ही भारतीयांसाठी फार मोठी शोकांतिका आहे.देशाच रक्षण करणारा एक सैनिक मात्र स्वतःच्या परिवाराच रक्षण करू शकला नाही हे त्याच दुर्दैव म्हणायचं,या देशाचं म्हणायचं की गुन्हेगाराला कुठलीही शिक्षा न करणाऱ्या शासनाचं दुर्दैवी म्हणायचं.जेव्हा मणिपुरच्या घटनेची बातमी वर्तमानपत्रात वाचली तेव्हा या माहान भारतात असही होऊ शकतं या विचाराने मन शहारून गेले,संतापाचा उद्रेक झाला त्या नराधमला तर फाशीच दिली गेली पाहिजे होती. पण आपल्या देशाची न्याय वेवस्था संबंधित घडलेल्या प्रकरणाची चौकशी केल्याशिवाय गुन्हेगारांना शिक्षा देणार नाही हे मात्र तेव्हढचं सत्य.कारण त्या कसाबने डोळ्यादेखद कितीतरी निरपराध्याना यमसदनी पोहचवले सर्वकाही डोळ्यादेखद घडत असतानाही त्या कसाबच्या विरोधात चार वर्ष खटला चालला त्याला वाचवायला अनेक नामवंत वकील पुढे सरसावले.तेव्हा ज्या मणिपुरच्या महिलेवर अत्याचार झाला तिला कधी न्याय मिळेल, मिळेल की नाही?काही सांगता येत नाही. अरे ज्या देशातील राज्यकर्तेच एकमेकांचे वाभाडे, घोटाळे कढतात तेथे जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईलचना.रोज कुठेना कुठे काहीना काही महिला अत्याचाराच्या संदर्भात वाचायला मिळते.खरतरं घरा पासून ते दिल्ली पर्यंत,चुली पासुन ते मुलांपर्यंत असे एकही क्षेत्र शिल्लक राहिले नाही की तेथे स्त्रियांचा सहभाग नाही. आज प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत, उच्चपदस्थ अधिकारी आहेत सर्वच ठिकाणी महिला आघाडीवर सक्रिय आहे किंबहुना तिचे कर्तृत्व पाहता तिला रणरागिणी म्हणतो महिषासुरमर्दिनी म्हणतो हे फक्त बोलण्यापुरतेच मर्यादित आहे पण त्या रणरागिणीकडे सकारात्मक नजरेने पाहिले जात नाही.त्या महिलेच कर्तृत्व मोठे असताना तिच्यावर अन्याय अत्याचार होतो.केवळ वारेमाफ कौतुक,तारीफ आणि तरफदारी करून तिची वाहवा करायची व काही क्षणात तिचे कार्य विसरून तिच्यावर अत्याचार करायचा म्हणजे माणसाची मानसिकता इतकी का बरबटलेले असावी की तिच्या कडे बघण्याचा द्रुष्टीकोनच वाईट असावा?महिला कितीही प्रथम स्थानावर असली तरी पुरूषांकडून तिला दुय्यमस्थानच मिळते. पुरूषांपेक्षा महिलाचं कर्तृत्व वरचड असले तरी कौतुकाच्या माळा फक्त पुरूषांच्याच गळ्यात पडतात.म्हणजे स्त्री सबला असुनही अबला म्हणून जगण्याची वेळ या पुरूषप्रधान देशात तिला सहन करावी लागते.अरै कधीतरी पुरुषांनी एखाद्या कर्तबगार स्त्रीच्या कर्तृत्वाचा ध्वज उंचावर नेण्याच पुण्य पदरात घेतल पाहिजे. कारण स्त्री असो अथावा पुरूष दोघांनाही जन्म देणारी स्त्रीच असते.तिचा फक्त बाहुली समान उपयोग करून तिच्या आत्मसन्मानाला पायदळी तुडवणे म्हणजे पुरूषार्थ नाही.स्त्रील फक्त भोगवादी म्हणून न बघता तिचा आदर आणि सन्मानच केला गेला पाहिजे.पण य देशात असे होत नाही तिच्यावर अत्याचारच होतो आणि वर्षागणिक तिला न्यायाची प्रतिक्षा करावी लागते.
कुळाला वंशाचा दिवा हवा म्हणून आजही मुलगी झाली तर नाके मुरडली जातात किंवा गर्भाशयातच तिची हत्या केली जाते.याचा अर्थ स्त्री गर्भाशयातही सुरक्षित नाही? पुरूषाच्या खांद्याला खांदा लाऊन संघर्षाच्या विरोधात लढा देते तरीही ती दुय्यम स्थानावरच असते.खरतर तिच्या वेदनेत काहीच बदल झालेला नाही.आजही त्याच वेदना तोच आक्रोश घेऊन अत्याचार सहन करतेय आणि काही सुसंस्कृत माणसे निषेधाच्या मेणबत्त्या पेटवून मोर्चे काढतात. त्यापेक्षा त्याच क्षणी त्यांना गोळ्या घाला म्हणजे पुन्हा अत्याचाराचं धाडस कोणी करणार नाही. आहो स्त्री शिवाय पुरुषाचा जन्म नाही व स्त्री शिवाय पुरूष अपुर्णच असतो.असे माहित असुनही तिच्या रक्षणासाठी कोणत्याही पुरूषाचे पावले पुढे सरसावत नाही.भर रस्त्यावर तिला छेडले जाते,तिला जाळली जाते,तिचा चेहरा विद्रूप केला जातो तरी पुरूष मंडळी बघ्याची भुमीका घेऊन तिचा व्हिडीओ बनवतात!.अशा घटनेचे चित्रीकरण करण्यापेक्षा एकजुटीने जर अत्याचार करणाऱ्या नराधमला जागेवरच ठेचून मारले तर कोणत्याही स्त्रीला असुरक्षित वाटणार नाही. कृती केली तरच कार्य होते.पण मेरा भारत महान म्हणणाऱ्या भारत देशात अस होत नाही. फक्त एक दिवसासाठीच का आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा करायचा असतो का?महिलांच्या रक्षणाचा प्रश्न आता देशपातळीवर पोहचलाय.कोणत्याच देशात महिला सुरक्षित नाही.हा गंभीर विषय झाला आहे.या देशात रोज कुठेना कुठे महिलांची पिळवणूक, छळवणूक होते.पण महिला बदनामीला घाबरून इतस्ततः वाच्यता करत नाही शाळा,कॉलेज,क्लास, घराबाहेर गेलेली स्त्री अथवा मुलगी घरी परत सुरक्षित येण्याची खात्री आता देता येत नाही एव्हढी दहशत आपल्या अवतीभवती पसरलेली आहे.तेव्हा प्रश्न पडतो की हे कधी थांबेल केव्हा थांबेल की नाही.बघायला गेले तर सामाजिक शैक्षणीक,सांस्कृतिक,
वैद्यकीय,औद्योगिक,
क्रिडा,राजकीय उद्योगव्यवसाय आयटी अशा विविध क्षेत्रात महिलांनी क्रांती केली म्हटलतर त्यांची कामगिरी निश्चितच पुरुषांपेक्षा वरचड आहे अस असतानाही तिच्या कर्तृत्वाला कोणी फारस महत्व देत नाही.ज्या स्त्री पासुन एका पुरुषाच्या आयुष्याची सुरवात होते त्याच स्त्रीला कुणाच्यान कुणाच्या अत्याचाराला बळी पडावे लागते.तिच्या मुक असण्याचा गैरफायदा घेतला जातो खरतर सर्वच पुरूष काही एकसारखी नाहीत स्त्रीयांचा मानसन्मान, आदर राखणारे व तिच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करणारे पुरुषमंडळीही आहेत.पण काही
विक्षिप्त माणसही आहेत की त्यांचा महिलेच्या बाबती सकारात्मक द्रुष्टीकोन नाही.खरच हा समाज एवढा निगरगट्ट झाला आहे का?आपल्या या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला असतानाही या भूमीत स्त्रीयांच्या बाबतीत अमानवीय अत्याचार व्हावा!असे होत असेल तर भारत मेरा महान म्हणण्याचा कोणाला काहीच अधीकार नाही.आम्ही भारतीय आहोत किंवा गर्वसे कहो हम हिंन्दु है म्हणत फुशारक्या मिरवत फिरायच्या आणि जेव्हा महिलेचा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा तिच्या लज्जेचे रक्षण करण्या ऐवजी तिचा व्हिडीओ व्हायरल केला जातो.म्हणजे माणसांच्या मानसिकतेची लाज वाटते.जेव्हा या देशात स्त्रियांना सुरक्षीत वाटेल अशी वागणूक मिळेल,तिच्यावरचे अत्याचार थांबतील,तिला सौरक्षण मिळेल,तिच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करून तिच्यासाठी सन्मानाच्या पायघड्या टाकल्या जातील,तिचा आदर केला जाईलं,स्त्री पुरूष समानता असे बोलण्यापुरता न राहता प्रत्यकक्षात त्यांचा अधिकार व.स्वतंत्र दर्जा दिला जाईल आणि योग्य वेळी तात्काळ न्याय तिला मिळेल तेव्हाच *सारे जहासे अच्छा हिंन्दुस्ता हमारा म्हटला जाईल*.

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + eleven =