You are currently viewing काजरकोंड पुलाच्या मुशीत अडकलेले लाकडाचे ओंडे, कचरा केला साफ

काजरकोंड पुलाच्या मुशीत अडकलेले लाकडाचे ओंडे, कचरा केला साफ

काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वतः जेसीबी चालवत केली मदत

सावंतवाडी

सामाजिक कार्यात इतरांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे असणारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वत जेसीबी चालवत सावंतवाडी व कोलगाव गावाला जोडणाऱ्या काजरकोंड पुलाच्या मुशीत अडकलेले लाकडांचे ओंडे व इतर कचरा साफ करुन पुलाला मोकळा श्वास दिला.

सावंतवाडी तालुक्यात सद्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असतांना नदि नाल्यांना पुरस्थिती पाहायला मिळत आहे. अशातच नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून वाहत आलेले लाकडी ओंडे व कचरा कोलगाव काजरकोंड ओहळावरील पुलाच्या मुशीत अडकले होते. यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होऊन पाण्यात पुलाच्या बाहेरुन वाहत होते. याबाबत तेथील ग्रामस्थांनी श्री सांगेलकर यांच्या कानावर गोष्ट घालून मदतीची हाक दिली. श्री सांगेलकर यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जेसीबी उपलब्ध करत तो स्वत चालवत पुलाच्या मुशीत अडकलेले लाकडी ओंडे व कचरा साफ केला. यामुळेच गेली काही दिवशी घुसमटलेल्या कजरकोंड पुलाने मोकळा श्वास घेतला. श्री सांगेलकर याच्या या कार्यात कोलगाव माजी सरपंच संदीप हळदणकर, बबन डिसोजा, बबलू डिसोजा, अजित हळदणकर, अनिल चव्हाण, पॉली डिसोजा यांनी हातभार लावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − two =