न्हावेलीत खनिजवाहतुक करणारे दोन डंपर अपघातग्रस्त

न्हावेलीत खनिजवाहतुक करणारे दोन डंपर अपघातग्रस्त

एक पलटी तर दुसरा घळणीवर आदळला

सावंतवाडी

सावंतवाडी रेडी मार्गावरील न्हावेली भटाचे टेम्ब येथे खनिजवाहतुक करणारा डंपर पलटी झाला. यात गाडीसह आतील मालाचे मोठे नुकसान झाले. तर याच मार्गावर न्हावेली शाळा नंबर १ शेजारी खनिजवाहतुक करणाऱ्या चालकाचा ताबा सुटून डंपर रस्त्यालगत घळणीवर आदळला. सुदैवाने या दोन्ही अपघातात चालक व वाहक यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा