You are currently viewing कळत नकळत

कळत नकळत

कळत नकळत

कळत नकळत
बरंच काही घडतं.
फुलांकडे आकर्षिलेलं,
नादान फुलपाखरू ही,
वाऱ्यासवे उडतं.

फुलांचं रूप मनाला,
वेडावून सोडतं.
रूपावर भाळलेलं,
वेडं मन मात्र..
फुलात अडकून पडतं.

फुलाला नसे तमा कशाची,
भुंग्यांनाही प्रेमाच्या जाळ्यात,
ते अलगद अडकवतं.
पाकळ्यांचे पाश आवळून भोवती,
कायमचंच…
बंदिस्त करून टाकतं…

कळत नकळत..
बरंच काही घडतं…!

(दीपी)
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + four =