You are currently viewing वसंत फुलला

वसंत फुलला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी सहा.पोलीस उपनिरीक्षक वासुदेव खोपडे यांची काव्यरचना

कसा वसंत फुलला
आज मनात वनात
माझ्या मनाचा हा भुंगा
भिर भिरतो फुलात !!

भिर भिरतो फुलात
फूल डोले वाऱ्यावर
रूप फुलाचं पाहून
मन नाही थाऱ्यावर !!

मन नाही थाऱ्यावर
कसं ऊधळे चौफेर
त्याले फुटले रे पंख
कसं उडे वाऱ्यावर !!

कसं ऊडे वाऱ्यावर
कळ्या फुलांत दंगल
रूप,गंधाच्या प्रेमात
रंग, रंगात रंगल !!

रंग,रंगात रंगल
देहभान हरखून
मोहरात रे आंब्याच्या
मन गेलं मोहरून !!

मन गेलं मोहरून
जीव जीवात भुलला
सारा आनंदी आनंद
कसा वसंत फुलला !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा