*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा महाकवी कालिदास प्रतिlष्ठान पुणे समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.ऐश्वर्या डगांवकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिपावली*
आनंदाची उधळण झाली
दिप उजळले आली दिवाळी
आकाशकंदील लावले दारी
विविधरंगी सजली रांगोळी.
दिव्यादिव्यांची आरास केली
फटाक्यांची आतिषबाजी
सोनपावलांनी आली दिवाळी
पक्वांनांची मेजवानी ताजी.
पक्वान्नांनी सजली थाळी
लाडू करंज्या शंकरपाळी
चिवडा चकल्या अन् कडबोळी
तृप्त झाली बालमंडळी.
उभे गंध रेखूनी कपाळी
झब्बा धोतर टोपी सुंदर
कानी शोभते भिकबाळी
पुरुष सजती फासून अत्तर.
रेशीम लुगडे लेणे भरजरी
लेऊन सजल्या सुंदर ललना
आतिषबाजी अन् फुलझड्या
जणू उतरल्या तारका अंगणा.
हर्षाने प्रकाशले जग सारे
स्वागतार्ह सानथोर आतुरले
आली दीपावली गड्यानो
आली दीपावली!
सौ ऐश्वर्या डगांवकर.पुणे
भ्रमणध्वनी – ९३२९७३६६७५.
