You are currently viewing तूच सदगुरु स्वामी समर्था

तूच सदगुरु स्वामी समर्था

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य लेखक कवी पत्रकार सागर बाणदार यांची अप्रतिम भक्तिरचना

ठायीठायी तूच स्वामीराया
भक्तीभावाने प्रचिती येई आता,
माझा अहंकारही पडे गळून
नुसता मुखाने नाम घेता ।।१।।
विश्वचालका,विश्वविधाता
तूच सदगुरु स्वामी समर्था……

या जगती मी पालापाचोळा
तरीही सांभाळून घे या भक्ता,
सदा आसशी तू पाठिशी
कसलीच न उरे चिंता ।।२ ।।
विश्वचालका, विश्वविधाता
तूच सदगुरु स्वामी समर्था…..

स्वामी दत्तप्रभूंचा तू अवतार
तुझा वास माझ्या चित्ता,
भवसागरातून मुक्त करण्या समर्थ
ठेवितो तुझ्या चरणाशी माथा ।।३ ।।
विश्वचालका, विश्वविधाता
तूच सदगुरु स्वामी समर्था…….

अखंड नामस्मरणाने मिळते सुख
तुझा महिमाही कळे आता ,
सर्वस्व वाहतो तुलाच मी
या लेकराची हो माता ।। ४ ।।
विश्वचालका, विश्वविधाता
तूच सदगुरु स्वामी समर्था…….

तूच कर्ता,तूच करविता
तुझाच मला एकमेव आधार,
नामाची धरता अखंड कास
सदगुरु तूच होशी मुक्तीदाता ।।५ ।।
विश्वचालका, विश्वविधाता
तूच सदगुरु स्वामी समर्था……..

@ रचना….
सागर अशोक बाणदार
इचलकरंजी
मो.8855915440

प्रतिक्रिया व्यक्त करा