You are currently viewing डॉ.विजय लाड यांच्या ‘दासबोध चिंतनसार’ ग्रंथाला पुरस्कार प्रदान.

डॉ.विजय लाड यांच्या ‘दासबोध चिंतनसार’ ग्रंथाला पुरस्कार प्रदान.

वैभववाडी

स.भ.डॉ. विजय लाड यांच्या ‘दासबोध चिंतन’ सार या ग्रंथाला २०२० सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मानाचा प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली माधवराव पटवर्धन सभागृह सदाशिव पेठ, टिळक रोड पुणे येथे देण्यात आला. सन्मानचिन्ह तसेच धनादेश रुपये सात हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात भरगच्च असा कार्यक्रम पार पडला. मोठ्या संख्येने मान्यवर तसेच समर्थ भक्त उपस्थित होते. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड तर्फे संपूर्ण कार्यक्रमांमध्ये मा.योगेश बुवा हे देखील उपस्थित होते.
श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळ यांच्यावतीने स.भ. डॉ. विजय लाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ.विजय लाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा