You are currently viewing आज छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मले तर.

आज छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मले तर.

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक नयन धारणकर लिखित अप्रतिम लेख*

*आज छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मले तर…*

गेल्या साडे तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास बघितला तर राजांच्या प्रत्येक चपखल युद्धानितीचे दर्शन आपल्याला होते. राजांचे शौर्य, राजांचा कर्तबगार, खंबीरपणा आपल्याला जीवनाशी संघर्ष करण्यास उत्स्फूर्त करतो. राजांच्या शौर्याकडे बघून आपल्याही नसानसात युक्तिवादी, तसेच शक्तिवर्धक उर्मी संचारते.
आज जगात चाललेल्या घडामोडींमुळे, राज्यात चाललेल्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष घटनांमुळे तुम्हाला असे वाटते ना स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यात पाहिजे होते. त्यांचा आदर्श आज जरी आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे उभा आहे तरी त्यांच्यासारखे नेतृत्व आपण नाही गाजवू शकत. किंवा ते पूर्वीचे स्वराज्य आज पुन्हा नाही उभे राहू शकत. म्हणूनच तुमच्या मताशी मी सहमत आहे की आज राजे आपल्यात पाहिजे होते. त्यांच्या पावलांचा स्पर्श या मातीला खूप हवाहवासा वाटतो.
राजे यदाकदाचित जर आपल्यात आले ना राज्यात चालणारे जनतेचे हाल, स्त्रियांवरील अत्याचार, मुलींवर वा अल्पवयीन मुलींवर अमानुषपणे केला जाणारा बलात्कार, हत्याकांड या सर्वांना आळा बसेल. पोलिस, आर्मी, राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान या सर्व राजकीय नेते मंडळींची काही आवश्यकता राहणार नाही. महाराज तेव्हा ज्या पद्धतीने न्याय निवाडा करत असत त्याच प्रकारे न्याय निवाडा आजही होईल.
याउलट शेतकऱ्यांना सुद्धा एक दिलासा मिळेल. त्यांची काळजी करणार एक हक्काचं कोणीतरी मिळेल. शेतकऱ्यांची सर्व कर्ज, शेतसारा माफ होईल. शेतकरी लोक नव्या उत्साहात शेतीच्या कामाला लागतील.
परंतू या राज्यात चाललेला जातीयवाद, विटंबना, परस्परविरोधी भांडणे, वादविवाद हे सर्व राजांना मुळीच आवडणार नाही. ज्या पद्धतीने लोक एकमेकांशी वैर धरून गैरव्यवहार करतात ते आमच्या राजांना या पूर्वीही कधी मान्य नव्हते आणि आजही मान्य होणार नाही. त्यांच्या राज्यात सर्वधर्म समभाव, सर्व जाती एकसमान असे नियम लागू असतात. त्यामुळे राजे जरी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीत अवतरले तरी या सगळ्याला त्यांच्या राज्यात स्थान नसेल.
जो माणूस परकियांचे धोरण स्वीकारून आपल्याच माणसाशी पैशासाठी, संपत्तीसाठी दुश्मनी करतो त्या माणसाला राजांनी कधीही त्यांच्या नजरेसमोरही उभे केले नाही. आणि आज आपण स्वतःच्या स्वार्थासाठी, संपत्तीसाठी, एकमेकांची गच्ची पकडतो. एकमेकांच्या जाती धर्माच्या नावाने बोलावून त्यांचा अहंकार जागा करतो. हे राजांच्या स्वराज्याच्या नियमाबाहेर आहे.
आणि राजांच्या बाबतीत दुसरी गोष्ट सांगायची झाली तर चूक झालेल्या माणसाला नेहमी स्वराज्याच्या नियमाप्रमाणे शिक्षा होत असे. परस्त्रियांवर हात टाकणाऱ्या लोकांचे तर डोळे काढून घेतले जात असत.
ही अशी शिवशाही पुन्हा एकदा अस्तित्वात आली तर मला वाटते महाराष्ट्र पुन्हा घडेल वारंवार चुका करणारे लोक चूक करणार नाहीत.
पण शिवाजी महाराजांसारखे शूरवीर निष्ठावंत, कीर्तीवंत, धनवंत, गुणवंत, प्रजापती, अश्र्वपती, श्रीमंत युगपुरुष राजा पुन्हा महाराष्ट्राच्या जन्माला येईल असे मला वाटत नाही. परंतु तरी देखील कुठेतरी वाटते की राजे कुठेही गेलेले नाहीत ते आपल्यात आहेत. प्रत्येक माणसाच्या कणाकणात, रगारगात वसले आहेत. त्यामुळेच आपले सर्वांचे मराठी रक्त सळसळत असते. आणि ते कायम सळसळत राहायला पाहिजे. जिथे जिथे आपण आवाज देऊ महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ल्यावर ठिकठिकाणी राजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. जर आपण सर्व खरे शिवभक्त असाल तर ती जाणीव प्रत्येक मराठी माणसाला व्हायलाच हवी.
जर तुम्हाला सर्वांना वाटत असेल राजे पुन्हा आपल्यात यावे तर पहिले स्वतः सुधारा, मग इतरांना सुधरवा. राजांचे गुण आत्मसात करा. स्वतः मध्ये असलेला अहंकार, व्याधी, इतरांविषयी असलेली तुच्छता, आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला कमी लेखणे हे सर्व प्रथम बंद करा. अहो साधा भगवा हातात घेण्याची लायकी नाही आपली आणि आपण शिवाजी महाराज पुन्हा जन्मावे म्हणून इच्छा बाळगतो. राजांचे मावळे बघा शरीराने काटक, मनाने खंबीर, आणि जीव गेला तरी बेहत्तर पण स्वराज्य हासिल करू ही धमक,हिम्मत त्यांच्यात होती.
आपणही स्वतःला महाराजांचे मर्द मराठी मावळे म्हणतो ना पण महाराष्ट्राचा मावळा बनायला वाघाच काळीज पाहिजे प्रत्येकात, जे खऱ्या मावळ्यांमध्ये होत.
दूसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडायला राजमाता जिजाऊंसारखी आई प्रत्येकाला मिळायला हवी. राष्ट्रमाता जिजामातांनी स्वराज्याच्या मातीचे योग्य ते बाळकडू राजांना पाजले नसते तर आज शिवाजी महाराज म्हणून, रयतेचा राजा, महाराष्ट्राचा आदर्श म्हणून उदयास आले नसते.
अहो इथे आजच्या घडीला आई वडिलांना त्यांच्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येक मुलाचे आई वडील काम, जॉब, बिझनेस या सर्व ठिकाणी व्यस्त असतात. त्यांच्याकडे साधा मुलांना गोष्टी संगण्याईतपत सुद्धा वेळ नसतो. तर काय आजचा शिवाजी घडणार ? बर आई वडील आपल्या मुलांसाठीच जीवाचा आटापिटा करून जीवच रान करत असतात हे मात्र खरे आहे. पण आई वडिलांकडे मुलांकडे हवे तेव्हढे लक्ष द्यायला वेळ नाही हेही तितकेच खरे.
म्हणूनच,

राजमाता जिजाऊ सारखी
लाभली महाराजांना आई
खरे सांगतो ऐसा राजा मात्र
पुन्हा कधीही होणे नाही

माफ करा मी आई वडिलांना दोष देत नाही परंतु जे खरे आहे ती वास्तव स्थिती आज आपल्यासमोर मांडत आहे. कृपया सर्व आई वडिलांनी गैरसमज करून घेऊ नये. असो.
होय. राजे आज आपल्यात असते तर खरेच किती आनंद झाला असता नाही. सर्व लोक, जनता, स्त्रिया अभिमानाने ताठ मानेने जगले असते. कोणाचीही हिम्मत झाली नसती नजर मिळवण्याची.
तेव्हा खास आपल्या राजांसाठी एक करा जनतेच्या रक्षणासाठी आपल्या राज्यातील आया बहिणींच्या रक्षणासाठी कायम त्यांच्या मागे देशाचा सैनिक म्हणून उभे रहा, आपापसातील जातीवाद थांबवा, राज्यात एक नवे सर्वधर्म समभाव पाळून एक नवे साम्राज्य उभे करा. भांडण, खून, मारामाऱ्या हे सर्व कृपया टाळण्याचा प्रयत्न करा. याउलट हे सगळे नियम पाळून सर्वांना ताकीद देऊनही विनाकारण आपल्या वाटेत आडवे आलेच तर त्याला आपली मराठ्यांची औकात दाखवून द्या. एक मराठी वार त्यावर कराच. विशेषतः आया बहिणींवर हात टाकणाऱ्यांवर ताबडतोब कठोर कायदेशीर कारवाई करा. कारण आपल्या महाराजांच्या राज्यात चुका करणाऱ्या व्यक्तीला माफी नसते त्याची पहिली चूक हाच अक्षम्य अपराध असतो हेच खरे. हीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र आदरांजली असेल.

लेखक : नयन धारणकर, नाशिक

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा