*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फ्रेंडशिप डे*
नाती गोती अनेक असतात
एक नाते असेही असते
जिथे विश्वासाचे फुल उमलते
प्रेमाचा गंध दरवळतो
घेऊन परागकण
भ्रमरही मैत्रीचे नाते
आजन्म स्मरत
आनंदी जीवन
सदैव आपल्याच विश्वात
जगत असतो
आठवण येते सतत
जेंव्हा विश्वासाचा धागा
मैत्रीचे नाते जागवतो
नेत्र पाहता वाट
आशेचा किरण घेऊन
मैत्रीचा दिवस उगवतो…
दिवस आहे महत्त्वाचा
आठवणीत असावा
नजराणा हा मैत्रीचा
आनंदाने स्विकारावा
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
