You are currently viewing महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीवर सदस्यपदी कुडाळ – मालवण विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांची निवड…

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीवर सदस्यपदी कुडाळ – मालवण विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांची निवड…

राज्यातील सर्व सार्वजनिक उपक्रमांवर असणार या समितीचे नियंत्रण

महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम २११ व महाराष्ट्र विधानपरिषद नियमातील नियम २०९ अन्वये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष व विधानपरिषदेचे सभापती यांचेकडून महाराष्ट्र विधानामंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीवर सदस्यपदी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
या समितीची मुख्य म्हणजे राज्यातील सार्वजनिक उपक्रमांची प्रतिवृत्ते व लेखे तपासणे आणि त्यांची स्वायत्तता आणि कार्यक्षमता यांच्या संदर्भात त्या उपक्रमाचे व्यवहार सुस्थिर व्यापारी तत्त्वावर आणि दूरदृष्टीच्या वाणिज्यिक प्रथांनुसार करण्यात येत आहेत किंवा कसे याचे परिक्षण करणे ही समितीची कामे आहेत.
विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या कार्यकक्षेतील सार्वजनिक उपक्रमांची यादी :

गृह विभाग
(१) महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित.
गृह (परिवहन) विभाग
(२) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
गृहनिर्माण विभाग
(३) शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित ,
महसूल विभाग
(४) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित
वन विभाग
(५) महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित
नगरविकास विभाग
(६) महाराष्ट्र शहर व औद्योगिक विकास महामंडळ ,
(७) महाराष्ट्र नागरी पायाभुत विकास कंपनी मर्यादित .
(८) महाराष्ट्र नागरी पायाभुत निधी विश्वस्त कंपनी मर्यादित ,
(९) नागपूर मास ट्रान्सपोर्ट कंपनी मर्यादित
(१०) मुंबई मेट्रो रेल महामंडळ मर्यादित
वैद्यकीय शिक्षण विभाग
(११) हाफकिन अंजिठा औषध निर्माण मर्यादित .
(१२) हाफकिन जीव – औषध निर्माण महामंडळ .
उद्योग विभाग
(१३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,
(१४) महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ,
(१५) महाराष्ट्र विक्रीकर रोखे प्राधिकरण मर्यादित .
(१६) कोकण विकास महामंडळ मर्यादित .
(१७) पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित.
(१८) महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित .
(१९) कृपानिधी मर्यादित
उद्योग (खनिकर्म) विभाग
(२०) महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्यादित.
(२१) महा तामिल कोलरिज मर्यादित , (२२) एमएसएमसी अडकोली नैसर्गिक स्त्रोत मर्यादित.
(२३) एमएसएमसी बरोरा कोलरीज मर्यादित .
ऊर्जा विभाग
(२४) औरंगाबाद ऊर्जा कंपनी मर्यादित .
(२५) एमएसईबी सूत्रधारी कंपनी मर्यादित .
(२६) महाराष्ट्र ऊर्जा विकास कंपनी मर्यादित .
(२७) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी .
(२८) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी .
(२९) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी .
(३०) महागुज कॉलरीस मर्यादित
(३१) महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग कृषी विभाग
(३२) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित .
(३३) महाराष्ट्र किटकनाशके मर्यादित .
(३४) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित .
पशुसंर्वधन , दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग
(३५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ मर्यादित .
(३६) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मर्यादित .
सहकार विभाग
(३७) महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित .
पणन विभाग
(३८) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ,
वस्त्रोद्योग विभाग
(३९) महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित ,
(४०) महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित .
सांस्कृतिक कार्य विभाग
(४१) महाराष्ट्र चित्रपट , रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित .
पर्यटन विभाग
(४२) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित ,
सामाजिक न्याय विभाग
(४३) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित .
(४४) महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ ,
(४५) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित ,
(४६) संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ .
वि.जा.भ.ज. , इ.मा.व. , वि.मा.प्र . विभाग
(४७) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित .
(४८) शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्यादित .
(४९) वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित .
कौशल्य विकास विभाग
(५०) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित .
जलसंधारण विभाग
(५१) महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ ,
जलसंपदा विभाग
(५२) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ ,
(५३) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ .
(५४) कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ ,
(५५) तापी पाटबंधारे विकास महामंडळ ,
(५६) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ .
नियोजन विभाग
(५७) महाराष्ट्र पाटबंधारे वित्तीय कंपनी मर्यादित .
अल्पसख्यांक विभाग
(५८) मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित .
आदिवासी विभाग
(५९) शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित .
सामान्य प्रशासन विभाग
(६०) महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ ,
सामान्य प्रशासन विभाग (नागरी उड्डाण)
(६१) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित .
(६२) मिहान इंडिया लि .
(६३) नागपूर उड्डाण क्लब .
सार्वजनिक बांधकाम विभाग
(६४) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ,
महिला व बालविकास विभाग
(६५) महिला आर्थिक विकास महामंडळ.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − two =