You are currently viewing सत्तेतून झालेला विकास लोकांच्या नशिबी कधी ?

सत्तेतून झालेला विकास लोकांच्या नशिबी कधी ?

*सत्तेतून झालेला विकास लोकांच्या नशिबी कधी ?*

*ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर*
——————————————
महाराष्ट्रात घराणेशाही प्रथम पासूनच होती. पण तिची वाटचाल सध्याच्या हवामान सारखी झाली असून हेच वारे राजकीय पक्षांतील नेत्यांच्या प्रकर्षाने जाणवत असून सत्तेशिवाय कुणी राहू शकत नाही. हे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर अधोरेखित झाले. म्हणूनच महाविकास आघाडी ते पुन्हा शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचा कारभार सुरू झाला आहे. यावर भाष्य करण्याचा प्रयत्न !
—————————————–
भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येणार होते. हे सर्वश्रुत असताना शहकाटशह सुरू झाला. आमचे एकशे पाच म्हणजे आमचा मुख्यमंत्री असा हट्ट धरून बसले होते. त्यात बंद दरवाजाआड जी आश्वासने दिली गेली त्यांची जपणूक करण्यात दुहेरी नेतृत्वाला अपयश आले. शेवट पर्यंत आम्ही एकत्रित लढलो जनतेनं आपणास कौल दिला आहे. त्याप्रमाणे आपण जाऊया असे ठरविण्यात दुहेरी नेते मंडळींना यश आले नाही . भाजपा शिवसेना नेतृत्त्वाला अपयश आले. कधी कोणी विचार केला नसताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे भिन्न विचारांचं सरकार सत्तेवर आले. मात्र अंतर्गत धुसफूस सुरू राहील. सत्तेपासून वंचित राहिलेला मोठा पक्ष मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना त्यांना मात्र पचनी पडत नव्हत्या. त्याचं कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय खेळीने मुख्यमंत्री पदाची माळ उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडली. तिथूनच खऱ्याअर्थाने संघर्षाला सुरूवात झाली. त्यात कोरोना सारख्या महामारीने डोके वर काढले. काहीसा प्रशासकीय अनुभव कमी असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांची दमछाक झाली. त्यातही त्यांनी चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळली. त्याबद्दल देशात आणि विदेशात त्यांची वावा झाली. त्यांच्या वैयक्तिक आजारपणाने आकस्मिक दुखणं लागले. त्यात त्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या . पुरेशी विश्रांती घ्यावी असा वैद्यकीय सल्ला त्यांना देण्यात आला. यांचा फायदा घ्यायचा भाजपने उठविण्याचा विडा उचलला. त्या दृष्टीकोनातून पावले पडू लागली. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आपल्या पक्षांतर्गत व बाहेर काय चाललंय याची कल्पना नव्हती. अधूनमधून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार त्यांना स्मरण करून देण्याचा प्रयत्न करतं होते. पण असे काही होईल यांची कल्पना ठाकरे यांना आली नाही. त्यांच्या जवळ फारसे छक्केपंजे नव्हते. साधी राहणी – साधा सरळ स्वभाव यामुळे कधी असा विचार मनात आला नाही. आजवर माझा माझ्या शिवसैनिक, आमदार, नगरसेवक हा कुणाच्या आमिषाला बळी पडणार नाही. अशी त्यांची धारणा होती. त्याचं वेळी केंद्रीय स्तरांवरील संस्था हाताशी धरून भाजपने संधीचा फायदा उठविला. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याचे कारण पुढे करून एकनाथ शिंदे यांना प्रथम गळाला लावलं गेले. इथून खऱ्या अर्थाने राजकीय उलथापालथ याला सुरूवात झाली. खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयापर्यंत गेला. वादे प्रतिवादे करण्यात आले. यात न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि समर्थक यांना दिलासा दिला. याचं दरम्यान मूळ शिवसेनेतून आयाराम गयाराम प्रवेश करू लागले. अद्याप ही प्रतिक्रिया जोर धरत असताना कित्येक दिवस नाराज असलेले महत्त्वाकांक्षी नेते अजित पवार यांनी आपल्या काकांना दणका दिला. पुन्हा एकदा एक वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले. काल तर काका पुतण्यांनी शक्ती प्रदर्शन केले. त्यामध्ये शिंदे आणि शिवसेना असा जो कलगीतुरा रंगला तोच अध्याय महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला पाहायला मिळाला. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातो आहे. यानिमित्ताने फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळालाय अशी अवस्था निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारी पार्टी असा शिक्कामोर्तब करून ४८ तास उलटले नाही. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्रांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. महाविकास आघाडीला तीन पक्षांचं रिक्षा सरकार म्हणताना सद्य परिस्थितीत शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकार सत्तेवर आले. असा हा सत्ताक्रम काय सांगू पाहतो आहे. खरंच विकासासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. असे तीनही पक्षाचे नेते छाती बडवून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. वाढती महागाई रोजगार आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निष्पन्न होऊ शकेल का? जेमतेम सव्वा वर्ष शिल्लक असताना अस्वस्थता पसरली आहे. ही अवस्था नाराजी नाट्य संपविण्यात यावी. शेवटी सत्ता ही कशासाठी हवी लोकांची कामे करण्यासाठी… आता तरी गुण्यागोविंदाने नांदत संसार करून सुखाचा मार्ग जनतेच्या नक्षीबी येऊ द्या !

– प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव
Phone : 99692 52991

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा