राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत कवी समाधान लोणकर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी
दि. 04 जून 2025 रोजी शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन पांडुरंग कृपा लॉन्स येवला, नाशिक येथे करण्यात आले होते. शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ,प्रशांत वाघ,राजेश वाघ या तिन्ही भावांनी मिळून काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक प्रसिद्ध,ज्येष्ठ कवी,कवयित्री,गझलकार,गायक यांनी आपल्या कविता ईमेल द्वारे प्रतिष्ठानला पाठवल्या होत्या. 156 कवितांची नोंदणी काव्य स्पर्धेसाठी झाली होती. या काव्यवाचन स्पर्धेसाठी तज्ञ अभ्यासू,अनुभवी, निष्पक्ष व प्रसिद्ध कवी, कवयित्री अशा चार परीक्षकांची निवड करण्यात आली होती. स्पर्धेच्या निकोप आणि निरपेक्ष निकालासाठी पाठांतर,कवितेचा आशय,सादरीकरण,वेळ आणि संदेश अशा सारणी प्रमाणे गुण ठरवलेले होते. या काव्यवाचन स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ,श्रेष्ठ,कवी, कवयित्री,गझलकार यांनी आपापल्या दर्जेदार रचना,गझला सादर केल्या. अतिशय नियोजित आणि उत्साहात ही काव्यवाचन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ असे क्रमांक काढण्यात आले. या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेमध्ये कवी समाधान दिनकर लोणकर, हिंगोली यांनी अव्वल क्रमांक मिळविला. त्यांच्या बाप या कवितेने व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कवितेला व सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.कवी समाधान लोणकर त्यांना प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांना विचारमंचावर बोलावून सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तके भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘बाप’ ही कविता पुन्हा एकदा सादर करावी असा विचारपीठावरील मान्यवर व निवेदक यांनी आग्रह केला. कवी समाधान लोणकर यांनी त्यांच्या दमदार शैलीमध्ये बाप ही कविता सादर केली या कवितेला पुन्हा प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद व दाद मिळाली. त्यांना काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्वांनी खूप शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
–———————————————
*संवाद मीडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
========================
11वी *science* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
Subject
*Physics, chemistry*
*Maths, Biology, IT*
*9 जून* पासून बॅच सुरू.
( पहिले 10 दिवस मोफत लेक्चर )
=========================
11वी *commerce* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
Subject
*Account, Economics,*
*Maths, English*
*9 जून* पासून बॅच सुरू.
=========================
*MHT- CET 2026* *दर रविवारी विशेष मार्गदर्शन*
रत्नागिरी मधील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी *सुवर्णसंधी*
Group.*PCM / PCB*
बॅच सुरू..*8 जून 2025 पासून सुरू.*
========================
*12वी science* च्या विद्यार्थ्यांसाठी.
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*
Batch timing
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* च्या विद्यार्थ्यांसाठी.
Subject
*Account, Economics, Maths, English*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*8वी ते 10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
विषय
*Maths, science*
*English, Sanskrit*
8वी आणि 9वी *9 जून 2025 पासून सुरू* प्रवेश सुरू आहे.
10 वी ची बॅच *7 एप्रिल पासून सुरू झाली आहे.*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.