You are currently viewing पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत सांगूळवाडी महाविद्यालयाचा अविनाश चेमटे राज्यात सहावा

पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत सांगूळवाडी महाविद्यालयाचा अविनाश चेमटे राज्यात सहावा

संचालक संदिप पाटील व संस्था साहाय्यक सुधाकर येवले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

वैभववाडी

महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सामायिक पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय सांगूळवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचा अविनाश संजय चेमटे(73.00) हा विद्यार्थी राज्यात सहावा आला आहे.

तसेच महाविद्यालयाचा अनिकेत अशोक कदम, अजित सतीश खंडागळे, विक्रम भागवत शिंदे. अलफिया जब्बार मुल्ला, आदिनाथ धनाजी इंगोले, राहुल धूळा पाटील, दीपक बाळासाहेब चोथे, अश्विन उत्तम विभूते, अक्षय कैलास घाडगे, श्रीकांत शंकर मोरे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री चेतन वाडेकर व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अनगरसिध्द शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार राहुल पाटील, संस्था संचालक श्री. संदीप पाटील, संस्था सहाय्यक श्री. सुधाकर येवले, प्राचार्य श्री. चेतन वाडेकर सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − seven =