You are currently viewing कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी मार्ग काढणार – राज्य कृषि आयुक्त धीरजकुमार यांचे आश्वासन

कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी मार्ग काढणार – राज्य कृषि आयुक्त धीरजकुमार यांचे आश्वासन

महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्था, वेंगुर्लेच्या काथ्या प्रकल्पास भेट

वेंगुर्ले

कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी एम. के. गावडे यांनी जिल्ह्यातील शाश्वत शेती बागायतीबाबत मांडलेल्या समस्या जाणून घेत राज्याचे कृषि आयुक्त श्री. धीरजकुमार यांनी, सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रगत शेतकरी प्रक्रिया उद्योग प्रतिनिधी व पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचेशी सविस्तर चर्चा करुन सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. सहकारी तत्वावरील कृषीशी निगडीत संस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषि आयुक्त श्री. धीरजकुमार यांनी रविवारी वेंगुर्ले येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या महिला काथ्या प्रकल्पास भेट देवून काथ्या प्रकल्पाची पहाणी केली. या भेटीत महिलांनी चालविलेल्या या काथ्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कृषि अधिक्षक श्री एस. एन. म्हेत्रे, कृषि उपसंचालक श्री. थुटे, आत्माचे कृषि उपसंचालक श्री. दिवेकर, उपविभागीय कृषि अधिकारी अजित अडसुळे, वेंगुर्ले तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, कृषि पर्यवेक्षक विजय घोंगे, श्री. नाईक, व कृषि पर्यवेक्षक श्रीमती वाडेकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा