You are currently viewing श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी दिली “पटेकर्स फ्रेशमार्ट” ला भेट

श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी दिली “पटेकर्स फ्रेशमार्ट” ला भेट

सावंतवाडी:

 

सावंतवाडी, माठेवाडा येथील श्री. काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट या अध्यात्म केंद्रात रविवारी सत्संग आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींचे प्रवचन व दर्शन सोहळा आयोजित केला होता. सदर कार्यक्रमास येताना श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी सायंकाळी श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री.परशुराम पटेकर यांच्या “पटेकर्स फ्रेशमार्ट” या सुपर मार्केटला खास भेट दिली.

सायंकाळी ५.३० वाजता श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींचे फ्रेशमार्ट, जुनाबाजार येथे आगमन झाले. पटेकर कुटुंबियांकडून त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. प्रथम स्वामींची पाद्यपूजा करून सुवासिनींनी पंचारती ओवाळून स्वागत केले. तद्नंतर उपस्थित स्वामी भक्तांनी श्री.काडसिद्धेश्वरांची आरती म्हटली व स्वामीजी आसनस्थ होताच उपस्थितांनी चरणस्पर्श करून त्यांचे दर्शन घेतले. सद्गुरूंनी नंतर फ्रेशमार्ट मध्ये फिरून सर्व माल पाहून माहिती घेतली व स्वतः सुद्धा काही सूचना करत पटेकर यांनी सावंतवाडीत सुरू केलेल्या सुपर मार्केटचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पटेकर्स फ्रेशमार्ट सुरू होऊन जवळपास नऊ महिने झाले असून ग्राहकांच्या पसंतीचे दालन बनले आहे. श्री. काडसिद्धेश्वर स्वामींनी भेट देत फ्रेश मार्टचे कौतुक केल्याने पटेकर कुटुंबीय भारावून गेले होते. यावेळी स्वामीभक्त परशुराम पटेकर, दीपक पटेकर, महेंद्र पटेकर, सौ.पूजा पटेकर, सौ.भूमी पटेकर, निमिष पटेकर, कु.मैथिली पटेकर, श्री.कानडे, मंगेश राऊळ, सतीश राऊळ, रोहिणी रेडकर, सौ.नेहा काष्टे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =