You are currently viewing जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे आज चित्र स्पष्ट होणार…

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे आज चित्र स्पष्ट होणार…

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवसःतात्काळ होणार चिन्हाचे वाटप…

सावंतवाडी

जिल्ह्यात होवू घातलेल्या ७० ग्रामपंचायतीचे आज सायंकाळी चार वाजे पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.त्यानंतर नेमका कशा आणी कोणात लढती होणार हे कळणार आहे.दरम्यान आज निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे.यासाठी १९० चिन्हांची यादी निवडणूक विभागाकडुन देण्यात आली आहे.जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतीसाठी १५३५ उमेदवार रिंगणात आहेत.आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दरम्यान तात्काळ चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे.मतदारांच्या सहजपणे लक्षात येईल असे चिन्ह निवडण्याकडे उमेदवारांचा कल असणार आहे.त्यामुळे १९० चिन्हे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.प्रत्येक उमेदवाराला पाच चिन्हाचा पर्याय आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =