You are currently viewing शासकीय जागेतले ”ते” बांधकाम हटविण्यात यावे 

शासकीय जागेतले ”ते” बांधकाम हटविण्यात यावे 

संतोष नानचे यांचं कार्यकारी अभियंता अनामिक जाधव यांना निवेदन सादर

कसई – दोडामार्ग शहरातील राज्यमार्ग क्र.189 ( दोडामार्ग – तिलारी – विजघर ) लगत शासकीय जागेत एका व्यावसायिकाने बांधकाम करून शासकीय जागा बळकावली आहे तरी या शासकीय जागेतील बांधकाम हटविण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनामिक जाधव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करत केली. सदर बांधकाम लवकर हटविण्यात यावे अन्यथा 25 नोव्हेंबर रोजी बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशाराही श्री. नानचे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेमध्ये झालेलं अतिक्रमण किंवा बेकायदेशीर बांधकाम काढून ती जागा खुली ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र वर उल्लेख केलेल्या बांधकामावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेलीनाही. शिवाय 13 जुलै 2022 रोजी या संदर्भात लेखी तक्रार अर्ज आपल्या विभागाला दिला होता. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात वर उल्लेख केलेल बांधकाम न पाडल्यास आम्ही दिनांक 25 नोव्हेंबर पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणा छेडणार आहोत असेही शेवटी श्री. नानचे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान कार्यकारी अभियंता अनामिक जाधव म्हणाल्या की, आपण यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 18 =