You are currently viewing ग्रामसेवकांची हजेरी यापुढे बायोमॅट्रिक प्रणालीने

ग्रामसेवकांची हजेरी यापुढे बायोमॅट्रिक प्रणालीने

ग्रामसेवकांची हजेरी यापुढे बायोमॅट्रिक प्रणालीने

युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे यश;अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन

दोडामार्ग

अखेर युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या पाठपुराव्याला यश आले.ग्रामसेवकांची हजेरी बायोमॅट्रिक प्रणालीने लागू करण्याबाबत ग्रामविकास विभागाने महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राव्दारे कळवले आहे.ग्रामविकास संघटन संस्था २०११ पासून त्यासाठी प्रयत्न करीत होती.परिपत्रक जारी झाल्यापासून तीन महिन्यात त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी; अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील जवळपास ९० टक्के ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ठरलेल्या कामाच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेत कधीही ग्रामपंचायतमध्ये हजर राहत नाहीत, यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक त्रासून गेले आहेत. ग्रामसेवकांच्या या बेजबाबदारपणामुळे ग्रामविकासासाठी शासनाकडून आलेला लाखो रुपयांचा निधी सुद्धा परत जातो, कारण त्या निधीतून कामे करण्यासाठी ग्रामसेवक ग्रामपंचायतला हजर राहत नाहीत. ग्रामसेवकांच्या या मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने युवाशक्ती ग्रामविकास संगठनने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या ३२ जिल्ह्यातील जिल्हा संघटनांच्या माध्यमातून ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी डिसेंबर २०११ पासून शासन दरबारी निवेदने देत सतत पाठपुरावा केला होता.त्याला यश आले आहे.

त्याबद्दल युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण, सचिव पुरुषोत्तम सदार व कोकण विभाग अध्यक्ष देवानंद चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अमित पाटील, कोकण विभाग सचिव अतुल मालकर, कोकण विभाग कोषाध्यक्ष नारायण शेडगे, व सर्व जिल्हा तालुका पदाधिकान्यांनी व सदस्यांनी ग्रामविकास विभागाचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 18 =