You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानीत जुगाराची मैफिल

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानीत जुगाराची मैफिल

*जिल्हा पोलिस अधीक्षकांना आव्हान*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या ओरोस येथील प्रसिद्ध हॉटेल “अंगाई” च्या शेजारील बंद घरात चालतो रात्रभर जुगाराचा अड्डा..! सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय असलेल्या राजधानीत सुरू असलेला हा जुगाराचा अड्डा नक्की कोणाच्या आशीर्वादाने चालतो..? खाकी वर्दीचा कोणता शिलेदार त्यांना मदत करतो..? हे शोधणे आणि जुगार अड्ड्यावर कारवाई करणे म्हणजे खुद्द पोलीस अधीक्षकांना आव्हान असल्यासारखे आहे.

ओरोस येथील हॉटेल “अंगाई” च्या बाजूला असलेल्या बंद घरातील जुगार अड्ड्याचे मुख्य पार्टनर हे मालवण, कणकवली येथील आहेत. रात्री ९.०० वाजता सुरू होणारा हा जुगाराचा अड्डा पहाटेच्या सुमारास बंद होतो. पहाटेपर्यंत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रात्रभर लाखोंची उलाढाल होते. जुगार खेळणाऱ्या एकट्या “(हु)षार” यानेच काल एका रात्रीत ४.०० लाख रुपये खेळले. यात त्याच्या पार्टनरने त्याला तब्बल ३.५० लाख रुपये दिले होते. परंतु दुर्दैव म्हणजे जुगारात पैसे हरल्यानंतर नाराज, हताश होऊन “(हु)षार” घरी गेला. असे कितीतरी हुषार या जुगार अड्ड्यावर आपले नशीब आजमावत असतात अन् हरल्यानंतर हताश होऊन पुन्हा नव्याने पैसे उभारण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत राहतात.

ओरोस येथे सुरू असणारा हा जुगार अड्डा म्हणजे पोलिसांनाच आव्हान असल्यासारखा आहे, परंतु खाकी वर्दीतील कोणीतरी नक्कीच त्यांना सामील असल्याने त्यांच्यावर अजून कारवाई होत नाही. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या प्रांगणात जुगाराचे फड उभे राहिल्याने पोलीस अधीक्षक त्यावर कारवाई करणार का..? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − three =